पोलिसांनी गणवेशात रिल्स करू तयार करून सोशल मिडियावर अपलोड नयेत, अशी सूचना वारंवार दिलेली असूनही त्यांच्याकडून काही पोलिसांकडून या सूचनेचे गांभीर्याने पालन होत नसल्यामुळे दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई (uspension action ) करण्यात आल्याची घटना घडली आहे.
गणवेशात कर्तव्यावर असताना रिल्स तयार करून ते इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याप्रकरणी २ रेल्वे पोलिसांवर (Mumbai Railway Police) निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एका महिला पोलिसाचा समावेश आहे. मध्य रेल्वेअंतर्गत पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस आणि पश्चिम रेल्वेअंतर्गत पोलीस ठाण्यातील एक पोलीस शिपाई यांनी काही दिवसांपूर्वी गणवेशात रिल तयार करून सोशल मडियावर शेअर केले.
याविषयी वरिष्ठांना माहिती मिळाल्यानंतर उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश दिले होते. याविषयी चौकशी सुरू असेपर्यंत दोन्ही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
गणवेशात असताना शिस्तीचे पालन आवश्यक आहे. गणवेशात असूनही रिल्स तयार करून शिस्तीचे पालन न केल्याप्रकरणी या पोलिसांनी त्यांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community