मुंबई आणि मुंबई उपनगरात (Mumbai Rain Alert) रात्रीपासूनच जोरदार पाऊस (Heavy Rain In Mumbai) कोसळत आहे. यामुळे मुंबईच्या अनेक सकळ भागात पाणी साचल्याच पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
#MumbaiRains : मुंबई महानगरातील सकाळच्या सत्रातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर#marathinews
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) July 8, 2024
काही सखाल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. आज दिवसभर देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Mumbai Rain Alert)
परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय घेणार
परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. पहिल्या (सकाळच्या )सत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पावसाच्या परीक्षेचा आढावा घेऊन दुसऱ्या सत्रातील म्हणजे दुपारच्या सत्रातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी द्यायची की नाही या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असं मुंबई महानगरपालिका प्रशासनकडून सांगण्यात येत आहे. तसेच नोकरदारांना देखील घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. (Mumbai Rain Alert)
सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचे परिपत्रक तातडीने जारी करण्याचे आदेश दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्याच्या कलेक्टरना दिले आहेत. (Mumbai Rain Alert)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community