बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीमुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने तामिळनाडू राज्यातील अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये गुरुवारी 8 डिसेंबरला शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या स्थितीमुळे महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर थंडीचा जोर कमी होणार आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत चक्रीवादळ उत्तर तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हे वादळ गेल्या सहा तासांत ताशी 10 किलोमीटर वेगाने पश्चिम- वायव्य दिशेने सरकले आहे.
( हेही वाचा: उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडल्यास पालिका जबाबदार! )
महाराष्ट्राची स्थिती काय?
बंगालच्या उपसागरात तयार होणारे चक्रीवादळ सध्या ईशान्य मान्सूनच्या नेहमीसारख्या घडणा-या नैसर्गिक प्रक्रियेसारखे पूर्व- पश्चिम साधारण 15 डिग्री अक्षवृत्त दरम्यान आग्नेयेकडून वायव्येकडे जात आहे. त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर विशेष परिणाम होणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community