Mumbai Rain : रात्रीच्या पावसामुळे मुंबई जातेय खड्ड्यांत

1243
Potholes : मुंबईत बुजवलेल्या चरांच्या जागीच निर्माण होतात खड्डे, पण संबंधित कंत्राटदारांना सोडले जाते मोकळे

मुंबईत पावसाळ्यात उद्भवणारे खड्डे तातडीने बुजवण्यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असून या सर्व खड्डयांवर २२७ प्रभागांमध्ये दुय्यम अभियंत्यांची नजर असेल असा दावा महापालिका प्रशासनाने केला होता. मात्र, कंत्राटदार नेमल्यानंतर तसेच खड्ड्यांची जबाबदारी रस्ते अभियंत्यांवर सोपवूनही खड्डे बुजवण्याच्या कामांमध्ये ढिलाईच होत आहे. मात्र, खड्डे दुरुस्तीच्या कामांमध्ये होणाऱ्या ढिलाईला रात्रीच्या वेळेत पडणारा पाऊसच कारणीभूत असल्याची माहिती समोर येत आहे. रात्रीच्या वेळीच खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले जाते आणि याच वेळी पाऊस पडत असल्याने खड्डे भरण्याचे काम तातडीने करता येत नाही, असे बोलले जात आहे. (Mumbai Rain)

मुंबईत मागील पावसाळ्यात सखल भागात जोरदार पावसामुळे पाणी साचत असल्याने काही रस्ते खराब तर काही ठिकाणी खड्डे सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर २२७ प्रभागातील दुय्यम अभियंत्यांनी नेमून दिलेल्या क्षेत्रात स्वयंप्रेरणेने, अधिक सक्रियपणे (Proactively) दौरे करून खड्डे शोधले जात आहे. खड्डे छोट्या आकारांचे असतानाच ते भरण्याचा प्रयत्न केला जात असून पावसाची उघडीप मिळताच खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेत रस्ते सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. (Mumbai Rain)

मात्र, मुंबईत खड्डे बुजवण्याची मोहिम तीव्र असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात अनेक रस्त्यांवर खड्डेसदृश्य स्थिती आहे. ९ मीटर पेक्षा कमी रुंदीच्या आणि त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवरील खड्डे कामांसाठी प्रत्येक परिमंडळ निहाय स्वतंत्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. पण यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला असला तरी खड्डयांची समस्या कायमच असल्याने आता तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. रस्त्यांवरील खड्डे हे ४८ तासांमध्ये दुरुस्त न केल्यास संबंधित रस्ते अभियंत्यांना मेमोही दिले जात आहेत. (Mumbai Rain)

(हेही वाचा – Jal Jeevan Mission च्या कामांची केंद्रीय टास्क फोर्सकडून समीक्षा; अशोक चव्हाणांच्या प्रश्नाला केंद्राचे उत्तर)

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे माजी नगरसेवक झाले जागे

परंतु मागील काही दिवसांपासून दिवसा पेक्षा रात्रीच्या वेळेतच अधिक पावसाची नोंद झालेली आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी सध्या मास्टिक अस्फाल्टचा वापर केला जात आहे. आणि हे मास्टिक रात्रीच्या वेळेत उपलब्ध होत असते. पण नेमक्या रात्रीच्यावेळीच पाऊस पडत असल्याने आणि पाऊस पडताना याचा वापर करता येत नसल्याने सध्या खड्डे बुजवण्याच्या कामांमध्ये मोठा अडथळा निर्माण होताना दिसत आहे. (Mumbai Rain)

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी कोल्डमिक्सचा वापर केला जायचा, परंतु आता कोल्डमिक्सचा वापर करण्यास बंदी असून मास्टिक असफाल्टचा वापर किरकोळ पावसाच्या सरी पडत असतानाही करता येत नाही. त्यासाठी पावसाची उघडीप महत्वाची आहे. तसेच दिवसा पावसाची उघडीप असली तरी मास्टिकचा साठा उपलब्ध होत नाही. कारण दिवसा मोठ्या वाहनांमध्ये मुंबईत प्रवेश बंदी आहे. त्यामुळे दिवसाही मास्टिक उपलब्ध करून देण्यासाठी या वाहनांना दिवसाही मुंबईत प्रवेश द्यावा लागेल तरच तातडीने खड्डे बुजवण्याचे काम करता येईल असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, सध्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे माजी नगरसेवक जागे झाले असून प्रत्येक नगरसेवक सोशल माध्यमावर व्हिडीओ अपलोड करत खड्ड्यांचे दर्शन घडवत आहे. (Mumbai Rain)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.