Mumbai Rain : विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात, अनेक भागांत साचलं पाणी

153
Mumbai Rain : पहिल्या पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याची समस्या यंदाही कायमच

आज म्हणजेच शनिवार २६ ऑगस्ट रोजी पहाटेपासूनच मुंबईमध्ये (Mumbai Rain) पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटेपासून अधून मधून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरात सकाळी सहा वाजल्यापासून पाऊस सुरू आहे. दरम्यान, कुर्ला (Kurla) सीएसटी रोड (Mumbai Rain) या परिसरात रस्त्यावर दीड ते दोन फूट पाणी साचलं आहे.

(हेही वाचा – National Space Day : 23 ऑगस्ट यापुढे राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा होणार, मोदींची मोठी घोषणा)

कुर्ला परिसरामध्ये (Mumbai Rain) अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. यामुळं कुर्ला सीएसटी रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. सध्या कुर्ला परिसरात पावसाचे जोर कमी झाला आहे. त्यामुळं सीएसटी रोडवर भरलेलं पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

अजूनही काही भाग कोरडेच

ऑगस्ट महिनासंपत आला तरीही (Mumbai Rain) राज्यातील अनेक शहरं मात्र पावसाच्या (Monsoon Update) प्रतीक्षेत आहेत. तर, सध्या कोणतीही वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रातील जोरदार पावसासाठी पूरक नाही, त्यामुळे येत्या ७ सप्टेंबरपर्यंत मुंबईसह कोकणात व काहीसा घाटमाथा वगळता उर्वरित राज्यात किरकोळ पावसाव्यतिरिक्त ढगाळ वातावरणाची शक्यता अधिक असणार आहे, असे माजी हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.