मुंबई, ठाण्यासह राज्याच्या काही भागात बुधवारी जोरदार पाऊस झाला. विशेषत: मुंबईत बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. तसेच गुरूवारी ही (२६ सप्टेंबर) मुंबई महानगरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे मुंबई महापालिका हद्दीतील शाळा आणि महाविद्यालयांना गुरूवारी सुट्टी (Schools and college closed due to rain) जाहीर करण्यात आली आहे. (Mumbai Rain)
अतिवृष्टीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, मुंबई महानगरपालिका आयूक्तांच्या निर्देशान्वये मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या खासगी प्राथमिक अनुदानित व विनाअनुदानित तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक (नर्सरी ते इ. १२ वी पर्यतच्या) शाळांच्या व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गुरुवार (२६ सप्टेंबर) रोजी सुट्टी (Schools and college closed due to rain) जाहीर करण्यात आली आहे. (Mumbai Rain)
(हेही वाचा – नाशिकच्या सभेत केंद्रीय मंत्री Amit Shah यांचा कार्यकर्त्यांना सल्ला; म्हणाले, ‘लोकसभेचा काळा डाग पुसून टाका’ )
भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) मुंबई महानगराला शुक्रवारी २६ सप्टेंबर २०२४ सकाळी ८.३० पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्यामुळे आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community