शुक्रवारी सकाळी दक्षिण आणि मध्य मुंबईत पावसाला सुरुवात झाली. तासभर कोसळल्यानंतर दहिहंडीत गोविंदांना भिजवण्यासाठीही वरुणराजा मुंबईत शुक्रवारी पावसाच्या शिडकाव्यांसह हजर राहिला. मुंबईच्या तुलनेत ठाण्यात आणि नवी मुंबईत मात्र वरुणराजाचा जोर जास्त होता. दुपारी बारानंतर मुंबईत ऊन-पावसाचा खेळ सुरु असतानाच, दहीहंडीचा खेळ ठिकठिकाणी रंगला आहे.
सकाळपासूनच पश्चिम उपनगरांतील बहुतांश भागांत पावसाची गैरहजेरी आहे. विलेपार्ले, सायन, चेंबूर, विद्याविहार, मुंबई विमानतळ परिसरात हलक्या पावसाच्या सरींनी हजेरी लावली. सकाळी दहा वाजण्यापूर्वीच हलक्या सरींनी या भागांत ब्रेक घेतला. पावसाची गैरहजेरी असली तरीही ऊन आणि वाढत्या आर्द्रतेसह घामांच्या धाराही दुपारनंतर वाढतील, अशी शक्यता आहे. सांताक्रूझ येथे आर्द्रतेचे प्रमाण ८८ टक्के तर कुलाब्यात ८६ टक्क्यांवर नोंदवले गेले आहे. ढगाळ वातावरणातच शुक्रवारचा दहिहंडीचा सण साजरा झाला.
( हेही वाचा: महाराष्ट्रासह 13 राज्यांमध्ये येऊ शकते वीज संकट, हे आहे कारण )
पुढील ४८ तासांतील हवामानाचा अंदाज –
पुढील २४ तासांत कमाल तापमान ३० तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअसवर राहील. ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील. पुढील ४८ तासांत कमाल तापमान ३० तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअसवर राहील. ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील.
Join Our WhatsApp Community