मुंबईच्या पावसाचा जोर कमी; पण वाऱ्याचा वेग वाढला

123
मुंबईत बुधवारी मनसोक्त कोसळलेल्या पावसाने गुरुवारी थोडा ब्रेक घेतला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याचा, अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने व्यक्त केला. इतर दिवसांच्या तुलनेत मुंबईत 45 ते 66 ताशी वेगाने वारे वाहतील, त्यामुळे प्रवासादरम्यान गारवाही सातत्याने जाणवेल.
सकाळपासून मुंबईत पावसाच्या हलक्या सरी सुरु आहेत. बुधवारी रात्रीपासून मुंबईत पावसाचा जोर घटल्याने, मुंबईतील वाहतूक पूर्वपदावर आली. लोकलसेवाही सुरळीत सुरु राहिली. सकाळी हलक्या सरींसह दिवसाची सुरुवात झाली असली तरीही कुठेही वाहतूक कोंडी जाणवली नाही. मुंबईत दिवसभरापासून पावसाच्या हलक्या सरी सुरु आहेत.
गेल्या सहा तासांत भायखळा, मुंबई सेंट्रल, हाजी अली दर्गा येथे अंदाजे 6 मिमीपर्यंत पाऊस झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुलाबा येथे केवळ पावसाचा शिडकावा सुरु आहे. पश्चिम उपनगरात वर्सोवा पम्पिंग स्टेशन परिसरात 16.75 मिमी पाऊस झाला. अंधेरी अग्निशमन केंद्रात 12.96 मिमी, चिंचोली अग्निशमन केंद्रात 17.5 मिमी पावसाची नोंद झाली. मध्य मुंबईत गव्हाणपाडा अग्निशमन केंद्रात 19.1 मिमी एवढा पाऊस झाला आहे. 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.