मुंबईत मागील आठवड्याच्या पावसाने मंगळवारी काहीशी विश्रांती घेतली. परंतु, रविवारी सकाळपासून मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाला (Mumbai Rain) सुरुवात झाली. त्यामुळे उन पावसाच्या खेळात मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागत होता. परंतु, रविवारी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पावसाचा अभाव, तापमानात वाढ आणि आर्द्रता यामुळे असह्य उकाड्याची जाणीव होत असताना शनिवारी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणामध्ये बदल जाणवला. ठाणे, नवी मुंबई परिसरामध्येही शनिवारी पावसाने चांगली उपस्थिती लावली.
दिवसभर उत्तर मुंबईत आभाळ ढगाळ असले तरी संध्याकाळी उशिरापर्यंत पावसाची उपस्थिती नव्हती.ऑगस्ट महिन्यात कुलाबा येथे ३१ दिवसांमध्ये पावसाने १०० मिलीमीटरचा टप्पाही गाठला नाही. त्यामुळे शनिवारी सकाळपासून पडलेल्या पावसाने दिवसभरात ३० मिलीमीटर पाऊस झाल्याने मान्सून पुन्हा सक्रीय झाला असेच काहीसे वातावरण मुंबई मध्ये रविवार सकाळपासून पाहावयास मिळाले.
सकाळी ७ वाजल्यापासून झालेल्या नोंदीनुसार १२ तासांमध्ये हाजी अली पम्पिंग स्टेशन येथे ८२ मिलीमीटर, मलबार हिल येथे ७७ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. कुलाबा पम्पिंग स्टेशन, ग्रँट रोड नेत रुग्णालय, बी विभाग कार्यालय येथेही ५० मिलीमीटर किंवा अधिक पावसाची नोंद झाली. त्या तुलनेत वांद्रेच्या पुढे उत्तर मुंबईत पावसाचा केवळ शिडकावा झाला. शुक्रवारी रात्री उशिरापासून नवी मुंबई परिसरातही पावसाची उपस्थिती होती. दिवसभरात मात्र फारसा पाऊस पडला नाही. दिवले, नेरुळ येथे २० मिलीमीटरच्या आसपास पाऊस नोंदला गेला. ठाण्यात मात्र ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढल्याचे दिसले. चिराग नगर, ओसवाल पार्क, मानपाडा येथे ४० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली.
(हेही वाचा :Hair Grow : केस कापल्यानंतर वेगाने वाढतात का?)
सकाळी पावसाचा जोर वाढल्यानंतर दुपारनंतर प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत इशाऱ्यानुसार ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला. शनिवारी मात्र कोकण वगळता इतर ठिकाणी पावसाचा जोर फारसा नव्हता. विदर्भात भारतीय हवामान विभागाच्या केंद्रांवर बहुतांश ठिकाणी अजिबात पाऊस पडला नाही. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील केंद्रांवरही फारसा पाऊस नव्हता. पावसाळी वातावरणाचा शहरातील तापमानावर चांगलाच परिणाम दिसून आला आहे.
वातावरणातील या बदलामुळे मान्सून पुन्हा सक्रिय
कर्नाटक ते विदर्भ या भागांमध्ये ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने तसेच उत्तर बंगालच्या उपसागरात चक्रीय वातस्थिती निर्माण झाल्याने राज्यातील पावसाला पुन्हा चालना मिळाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community