Mumbai Rain: महिनाभराच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा रिपरिप सुरू, रेल्वेचा वेग मंदावला

115
Mumbai Rain: महिनाभराच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा रिपरिप सुरू, रेल्वेचा वेग मंदावला
Mumbai Rain: महिनाभराच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा रिपरिप सुरू, रेल्वेचा वेग मंदावला

सुरूवातीस मुसळधार पावसानं (Maharashtra Weather) झोडपून काढल्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये मात्र हा पाऊस संपूर्ण राज्यातच लपंडावाचा खेळ खेळताना दिसला. दरम्यानच्या काळात सूर्यकिरणांनी बहुतांश जिल्हे न्हाऊन निघाले आणि अनेक ठिकाणी तापमानाचा आकडाही वाढला. आता राज्यात पुढील 2-3 दिवस सर्वत्र जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. (Mumbai Rain)

मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
मुंबईसह अनेक जिल्ह्यांना पावासाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पावासाच्या सरी कोसळल्या आहे. मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी देखील आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. (Mumbai Rain)

लोकलसेवा उशिराने
मुंबईत अंधेरी, विरार, भाईंदर, ठाणे, मुलुंड, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ आणि नवी मुंबईमध्ये सगळीकडेच मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक दिवासांच्या विश्रांतीनंतर पाऊसाला सुरवात झाली आहे. या पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचायला सुरूवात झाली आहे. पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. लोकलसेवा उशिराने सुरू आहे. (Mumbai Rain)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.