Mumbai Rain : दिवसभरात ३२ ठिकाणी झाली झाडांची पडझड

299
Mumbai Rain : दिवसभरात ३२ ठिकाणी झाली झाडांची पडझड

मुंबईतील अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसासह ६० ते ७० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असल्याने दिवसभरात ३२ ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे, तर ०६ ठिकाणी भिंती आणि घराचा काही भाग पडण्याचे प्रकार घडले आहेत. (Mumbai Rain)

मुंबईत सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहर भागांत ५९ मिमी, पूर्व उपनगरांत ५८ मिमी आणि पश्चिम उपनगरांत ७४ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. सायंकाळी पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहू लागल्याने मुंबईत एकूण ३२ फांद्या/झाडे पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहे. यामध्ये शहरात ०६, पूर्व उपनगरात ०९ व पश्चिम उपनगरात १७ अशा एकूण ३२ ठिकाणी फांद्या तथा झाडे पडण्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या. फांद्या तसेच झाडे तोडण्याचे व उचलण्याचे काम सुरु असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. (Mumbai Rain)

शॉर्ट सर्किटच्या दिवसभरात ०९ घटना

दिवसभरात संततधार सुरु असतानाच मुंबईत विविध ठिकाणी शॉर्ट सर्कीटच्या एकूण ०९ घटना घडल्या आहेत. या शहरात ०३, पूर्व उपनगरात ०४ आणि पश्चिम उपनगरात ०२ घटनांचा समावेश आहे. संबंधित विद्युत पुरवठा यंत्रणांना कळवून त्याठिकाणी मदतकार्य राबवण्यात आले आहे. (Mumbai Rain)

(हेही वाचा – Mumbai Rain : मोगरा आणि माहुल पंपिंग स्टेशनची कामे अद्यापही रखडलेलीच)

दिवसभरात सहा ठिकाणी पडली घरे

दिवसभरात भिंत तसेच घराचा भाग पडण्याच्या एकूण ०६ घटना घडल्या असून यात शहरात ०१, पूर्व उपनगरात ०१ व पश्चिम उपनगरात ०४ आदी घटनांचा समावेश आहे. (Mumbai Rain)

अंधेरी पश्चिमेतील गिल्बर्ट हिल मधील दरडीचा भाग कोसळला

पश्चिम उपनगरातील अंधेरी पश्चिम येथील गिलबर्ट हिल, सागर सिटी, बी इमारत येथे माती आणि दगडांचा काही भाग डोंगरावरुन घसरून खाली पडला. महापालिकेच्या के/पश्चिम विभागामार्फत घटनास्थळाची पाहणी करुन धोकादायक भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. या घटनेत कुणालाही मार लागलेला नसल्याची माहिती महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राने दिली आहे. (Mumbai Rain)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.