अंधेरी सबवेमध्ये पाणीच पाणी, रस्ता वाहतुकीसाठी बंद

मागच्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली आहे. मुंबईमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे अनेक भागांत पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर अंधेरीच्या साकीनाका परिसरातसुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मंगळवारी पहाटेपासूनच मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या चोवीस तासांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यासोबतच मुंबईसह महाराष्ट्रातील इतर भागातही मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी नद्या आणि नाल्यांना पूर आलेला असल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.

( हेही वाचा: उमेश कोल्हे हत्या प्रकरण: आरोपीची माहिती देणाऱ्याला NIA कडून 2 लाखांचे बक्षीस )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here