Mumbai Rain : मोगरा आणि माहुल पंपिंग स्टेशनची कामे अद्यापही रखडलेलीच

565
Mumbai Rain : मोगरा आणि माहुल पंपिंग स्टेशनची कामे अद्यापही रखडलेलीच
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबईतील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी यापूर्वी हिंदमाता, इर्ला, गझधरबंद, ब्रिटानिया, लव्हग्रोव्ह आणि क्लिव्हलँड या सहा पंपिंग स्टेशनची उभारणी केली असली तरी अद्यापही ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील मोगरा नाला तसेच मोगरा नाल्यावरील पंपिंग स्टेशनचे काम अद्यापही वादातच अडकले आहे. अंधेरीतील मोगरा नाल्यावर बांधण्यात येणाऱ्या पंपिंग स्टेशनची जागा खासगी असून सीआरझेडमध्ये असल्याने पर्यावरणीय परवानगीअभावी मागील १४ वर्षांपासून काम रखडले आहे. तर माहुल पंपिंग स्टेशनच्या जागेचा तिढा सुटला असला तरी परवागनी अद्यापही न मिळाल्याने याचेही काम रखडले आहे. (Mumbai Rain)

मोगरा नाल्यावरील पंपिंग स्टेशन करता महापालिकेने आतापर्यंत जागेची मुल्य म्हणून न्यायालयात ४५ कोटी रुपये भरले. त्यानंतर याबाबतच्या परवानगी आल्यानंतर या पंपिंग स्टेशनच्या बांधकामाकरता निविदा मागवून या जुलै २०२१ मध्ये कंत्राटदार निवडीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे १४ ते १५ वर्षांपासून अंधेरी ते जोगेश्वरी रेल्वे स्टेशनपरिसर, मालपा डोंगरी ते वर्सोवा परिसरातील असलेली ही समस्या अजुनही दोन वर्षांहून अधिक राहणार आहे. आता पंपिंग स्टेशन नाल्यातच उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. याही जागेचा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यात यावर खर्च करण्यात येणाऱ्या ३३० कोटी रुपयांच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. न्यायालयात या जमिनीच्या मालकीच्या मुद्दयावर सुरु असलेल्या कायदेशीर बाबीमुळे मोगरा पंपिंग स्टेशन कंद्राच्या भूसंपादनाच्या विलंब होत आहे. मात्र, याबाबत अद्यापही कोणताही निर्णय न झाल्याने याच्या कामाला सुरुवातही झालेली नाही. (Mumbai Rain)

माहुल खाडी पंपिंग स्टेशन

माहुल खाडीवर पंपिग स्टेशन बांधण्याचे कामही ब्रिमस्टोवॅड प्रकल्प टप्पा दोनमधील असून मागील १४ ते १५ वर्षांपासून ते कागदावरच आहेत. ही संपूर्ण जागा मिठागराची असून सरकारची जागा असूनही महापालिकेच्या या पंपिंग स्टेशनसाठी ताब्यात घेण्यास अद्याप यश आलेले नाही. मुंबई महापालिका आयुक्त हे आपत्कालिन व्यवस्थापनाचे प्रमुख आहेत. तरीही त्यांना आपत्कालिन कायद्याचा वापर करून मिठागर आयुक्तांकडून ही जागा महापालिकेच्या ताब्यात देण्यासाठी प्रयत्न करावेसे वाटले नव्हते. (Mumbai Rain)

आजही १४ ते १५ वर्षे उलटत आले तरी केवळ सरकारी अडचणींमुळे हे पंपिग स्टेशन रखडलेले आहे. हे पंपिंग स्टेशन बनल्यास माटुंगा, शीवसह पूर्व उपनगरातील तुंबणाऱ्या पाण्याची बऱ्याच मोठ्या प्रमाणावर समस्या मिटेल. परंतु ही जागाच सीआरझेडमध्ये आल्याने याठिकाणी बांधकाम करता येणार नसून या कामासाठी निविदा काढण्यात आली असली तरी प्रत्यक्षात जागेचाच पत्ता नसल्याने भविष्यात याचा खर्च किती वाढतो आणि पुराची समस्या कधी मिटते याकडेच सर्वांचे लक्ष आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मीठ आयुक्तांकडे केंद्र शासनातील जमीन प्रस्तावित माहुलच्या पंपिंग स्टेशनसाठी जमिन अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याकरता मीठ आयुक्तांकडे पत्रव्यवहार सुरु असून वाटाघाटी सुरु आहे. या जमिनी अधिग्रहीत केल्यानंतर मोगरा आणि माहुल पंपिंग स्टेशनच्या कामाला सुरुवात केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Mumbai Rain)

(हेही वाचा – Parliament Session : सुनील तटकरे यांची प्रतिज्ञा; जोपर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत…)

सहा पंपिंग स्टेशनचे काम
इर्ला पंपिंग स्टेशन

एकूण पंप : ८

प्रति सेकंदाला पाणी बाहेर टाकण्याची क्षमता : ४८ हजार लिटर

एकूण खर्च : ९२ कोटी रुपये

कोणत्या भागाला फायदा : वर्सोवा, विलेपार्ले

सुरु झाले : २०१०

वरळी हाजीअली पंपिंग स्टेशन

एकूण पंप : ६

प्रति सेकंदाला पाणी बाहेर टाकण्याची क्षमता : ३६ हजार लिटर

एकूण खर्च : ९९ कोटी रुपये

कोणत्या भागाला फायदा : नाना चौक, ताडदेव, पेडररोड

सुरु झाले : २०१०

क्लीव्ह लँड बंदर पंपिंग स्टेशन

एकूण पंप : ७

प्रति सेकंदाला पाणी बाहेर टाकण्याची क्षमता : ४२ हजार लिटर

एकूण खर्च : ११२ कोटी रुपये

कोणत्या भागाला फायदा : दादर लोअर परळ, एलफिन्स्टन रोड

सुरु झाले : वर्ष २०१५

वरळी लव्हग्रुव्ह पंपिंग स्टेशन

एकूण पंप : १०

प्रति सेकंदाला पाणी बाहेर टाकण्याची क्षमता ६० हजार लिटर

एकूण खर्च : ११६ कोटी रुपये

कोणत्या भागाला फायदा : चिंचपोकळी, सातरस्ता, भायखळा, जे.जे.मार्ग, करी रोड आणि वरळी

सुरु झाले : वर्ष २०१५

ब्रिटानिया पंपिंग स्टेशन

एकूण पंप : ६

प्रति सेकंदाला पाणी बाहेर टाकण्याची क्षमता : ३६ हजार लिटर

एकूण खर्च : ११५ कोटी रुपये

कोणत्या भागाला फायदा : लालबाग, हिंदमाता, काळाचौकी, भायखळा, रे रोड

सुरु झाले : वर्ष २०१६

शिवाय रस्त्यांची उंची वाढवून त्याखाली टाकी बांधणे, सेंट झेवियर्स मैदान व प्रमोद महाजन मैदानात भूमिगत टाकी बांधणे, यासाठीची जलवाहिनी टाकणे आदींवर सुमारे २००हून अधिक खर्च

खारदांडा गजधरबांध पंपिंग स्टेशन

एकूण पंप : ६

प्रति सेकंदाला पाणी बाहेर टाकण्याची क्षमता : ३६ हजार लिटर

एकूण खर्च : १३१ कोटी रुपये

कोणत्या भागाला फायदा : जुहू कोळीवाडा, दौलत नगर, शास्त्री नगर, पी अँड टी कॉलनी, लिंकीग रोड

सुरु झाले : जून २०१९ (Mumbai Rain)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.