मुंबईतील पावसाचा लोकल सेवेला फटका; तिन्ही मार्गांवरील लोकल वाहतूक धीम्या गतीने

107

सोमवार संध्याकाळपासून कोसळणा-या पावसाने मुंबईला झोडपून काढले आहे. राज्यभरात सर्वदूर पाऊस होत आहे. मुसळधार पावसाचा फटका तिन्ही मार्गांवरील लोकल सेवेला बसला आहे. मंगळवारपासून कोसळणा-या पावसामुळे पश्चिम,मध्य आणि हार्बरवरील लोकल सेवेवर परिणाम झाला आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत 

हार्बर मार्गावरील जुईनगर रेल्वे स्टेशन परिसरात पाणी साचले आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. तसेच, मध्य रेल्वेच्या कुर्ला रेल्वे स्टेशनच्या रुळांवर पाणी साचल्याने, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

( हेही वाचा: परशुराम घाटात सुरक्षिततेसाठी उपाययोजना का नाहीत; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले )

हवामान खात्याकडून या विभागांना ऑरेंज अलर्ट 

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, चंद्रपूर

या विभागांना यलो अलर्ट

मुंबई, ठाणे, पालघर , पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, नागपूर, अमरावती, गडचिरोली

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.