Mumbai Rains : मुंबईसह उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस; मध्य रेल्वे विस्कळीत

Mumbai Rains : मुंबईत ६ जुलैच्या रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. काल रात्रीपासूनच मुंबई शहरासह उपनगरातही चांगला पाऊस होतांना दिसत आहे.

197
Rain Update: पुढचे ३ तास महत्त्वाचे, मुंबई, कोकण, रायगड आणि 'या' परिसरासाठी हवामान विभागाने दिला महत्त्वाचा इशारा; वाचा सविस्तर...
Rain Update: पुढचे ३ तास महत्त्वाचे, मुंबई, कोकण, रायगड आणि 'या' परिसरासाठी हवामान विभागाने दिला महत्त्वाचा इशारा; वाचा सविस्तर...

मुंबई, पुण्यासह राज्यात दमदार पाऊस; पहिल्याच पावसात मध्य रेल्वेचे तीन तेरासध्या मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, सातारा, सांगली या भागात दमदार पाऊस कोसळताना दिसत आहे. (Mumbai Rains)

(हेही वाचा – IND vs ZIM 1st T20 Match: टीम इंडियाची ‘यंग ब्रिगेड’ झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात ठरली अपयशी!)

राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. यामुळे राज्यातील नागरिक सुखावले आहेत. तर काही ठिकाणी पावसामुळे नुकसान झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. सध्या मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, सातारा, सांगली या भागात दमदार पाऊस कोसळताना दिसत आहे.

मुंबईत दमदार पावसाला सुरुवात

मुंबईत ६ जुलैच्या रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. काल रात्रीपासूनच मुंबई शहरासह उपनगरातही चांगला पाऊस होतांना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याचे चित्र दिसत होते. यामुळे मुंबईला दमदार पावसाची प्रतीक्षा होती. त्यातच शहराच्या तलावांमध्ये पाणी पातळी निच्चांकी स्तरावर पोहोचली होती. त्यामुळे सर्व मुंबईकर हे जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत होते. तसेच मागील काही दिवस दडी मारुन बसलेल्या पावसामुळे उकाडाही वाढला होता. पण अखेर ६ जुलैच्या रात्री मुंबईसह उपनगरे आणि नवी मुंबई परिसरात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे.

मध्य रेल्वे विस्कळीत

मुंबईत कोसळत असलेल्या पावसामुळे रस्ते वाहतूक सुरळीत असली तरी लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईत पावसामुळे मध्य रेल्वे (Central Railway) पुन्हा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसएमटीच्या (CSMT) दिशेने जाणाऱ्या गाड्या या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याची माहिती रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

वसई विरार या ठिकाणही रात्रभर रिमझिम पाऊस कोसळताना दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभर पावसाचा जोर असाच कायम रहाणार आहे. सध्या विरार (Virar) ते चर्चगेट या पश्चिम रेल्वेवरील लोकल सुरळीत धावत आहेत. तसेच वाहतूक सेवेवरही कोणताही परिणाम पाहायला मिळत नाही. (Mumbai Rains)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.