मुंबईत झालेल्या पहिल्याच मोठ्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. ७ जुलैच्या रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने मध्य रेल्वेची वाहतूक ठाण्यापासून ठप्प झाली होती. पहाटेपासून ठाण्याकडून सीएसएमटीच्या दिशेने कोणतीही लोकल रवाना झालेली नसल्याने ठाणे, दादर या रेल्वे स्थानकांत मोठी गर्दी झाली होती. मात्र सकाळी साडेसात वाजल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. सीएसएमटी ते ठाणे या दोन्ही मार्गांवरील लोकल सेवा धीम्या गतीने सुरु आहे. (Mumbai Rains)
(हेही वाचा – मित्रांसोबत दारू पार्टी करणाऱ्या बारवर कारवाई सुरू; Worli hit and run प्रकरणी एक्साईज विभाग अॅक्शन मोडवर)
हार्बरही पूर्वपदावर येण्यास सुरुवात
मध्य रेल्वेवरील भांडुप-विक्रोळी, तर हार्बर मार्गावरील किंग्ज सर्कल, वडाळा, टिळक नगर यांसारख्या सखल भागात पावसामुळे पाणी साचून लोकल विस्कळीत झाली. त्यामुळे ठाणे, गोरेगाव, मानखुर्द पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक सकाळी सहा वाजता ठप्प झाली होती. आठ वाजल्यानंतर लोकल पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली, मात्र ती २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहे.
दादर ईस्टला वाहतूक कोंडी
दादर स्थानक परिसरातही वाहतूक कोंडी झाल्याने नोकरदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. ईस्टकडे स्टेशनबाहेरील स्वामीनारायण मंदिर परिसर जलमय झाला आहे. मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचले. त्यामुळे काही काळ ट्राफिक जाम झाले होता.
महापालिका शाळांना सुट्टी
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या शाळांना सकाळच्या सत्रात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे पाणी साचल्यानंतर प्रशासनाने बीएमसीच्या शाळांना सु्ट्टी देण्याचा निर्णय घेतला. (Mumbai Rains)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community