Mumbai Rains : मुंबईतील त्या भागांमध्ये पाणी का तुंबले? आपत्कालिन व्यवस्थापन प्राधिकरणांची बोलावली बैठक

916
Mumbai Rains : मुंबईतील त्या भागांमध्ये पाणी का तुंबले? आपत्कालिन व्यवस्थापन प्राधिकरणांची बोलावली बैठक
Mumbai Rains : मुंबईतील त्या भागांमध्ये पाणी का तुंबले? आपत्कालिन व्यवस्थापन प्राधिकरणांची बोलावली बैठक
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

रविवारी मध्यरात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी मुंबईतील (Mumbai Rains) विविध भागांमध्ये पाणी साचून अनेक भाग जलमय झाले होते. यामध्ये प्रामुख्याने हिंदमाता, मिलन सब वे, अंधेरी सब वे, गांधी मार्केटसह इतर भागांचा समावेश होता. तसेच भांडुप रेल्वे स्थानक परिसरातही पाणी तुंबले गेले. त्यामुळे पंपिंग स्टेशन्स, मिनी पंपिंग स्टेशन तसेच पंपाची व्यवस्था केल्यानंतरही या भागांमध्ये पाणी साचून राहिल्याने तसेच निचरा होण्यास विलंब झाल्याने आता याची कारणे शोधली जात आहे. यासाठी येत्या गुरुवारी शहर आणि उपनगरे आपत्कालिन व्यवस्थापन प्राधिकरणांची बैठक आयोजित केली असून या बैठकीत पाणी जमा झालेल्या या भागांची माहिती तसेच त्यांची कारणे जाणून घेतली जाणार आहेत,अशी माहिती मिळत आहे. (Mumbai Rains)

(हेही वाचा- Animal Licence : विदेशी प्राणी पाळण्याचा छंद आहे ? वाचा काय आहेत नवे नियम…)

मुंबईत सोमवारी पहाटेपासून अनेक भाग पाण्याखाली जावून मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले. भांडुप, शीव, चुनाभट्टी आदी भागांमध्ये पाणी साचल्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या होत्या, ज्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर रुजू होणाऱ्या नोकरदारांना रजा घ्यावी लागली तर खासगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम करावे लागले. मात्र, या पहिल्याच मुसळधार पावसात  हिंदमाता परिसर, मिलन सब, गांधी मार्केट, अंधेरी, मालाड सब वे यासह वडाळा, भांडुप, घाटकोपर, मालाड मालवणी आदी भागांसह विविध ठिकाणी पाणी तुंबले गेले. (Mumbai Rains)

मात्र, हिंदमाता आणि मिलन सब वे सह गांधी  मार्केटच्या ठिकाणी विविध प्रकारची व्यवस्था तसेच उच्च क्षमतेचे पंप आणि भूमिगत टाक्यांची रचना करूनही पाणी तुंबल्याने महापालिकेचे अधिकारी गोंधळात पडलेले आहे. महापालिकेला अनपेक्षित अशाप्रकारचा धक्का याठिकाणी पाणी साचल्यामुळे पडला असून या भागात पाणी का साचले आणि त्याचा निचरा का झाला नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. याकरता आता गुरुवारी मुंबई शहर आणि उपनगर आपत्कालिन व्यवस्थापन प्राधिकरणांची बैठक आयोजित करून ज्या ज्या भागांमध्ये पाणी तुंबले होते, त्या भागांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच पुढील मुसळधार पावसात  त्या ठिकाणी पाणी साचू नये तसेच पाण्याचा निचरा त्वरीत व्हावा याकरता कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे याकरता हा आढावा बैठक असल्याचे बोलले जात आहे. (Mumbai Rains)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.