मुंबईत बुधवार, २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 ते रात्री 10 च्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. (Mumbai Rains) यामुळे बघता बघता विविध सखल भागांत पाणी साचले. अंधेरीतील सिप्झ (Andheri Seepz) परिसरात मेट्रोच्या कामासाठी खड्डा खोदण्यात आला होता. त्या खड्ड्यात पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अंडरग्राऊंड मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात महिला पडून 100 मीटर वाहून गेली. अग्निशमन दलाने एक ते दीड तास सर्च ऑपरेशन राबवून महिलेला नाल्यातून बाहेर काढले. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांच्या वेळी तिचा मृत्यू झाला आहे. विमला अनिल गायकवाड (वय 45 वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे.
(हेही वाचा – भातसातील पाणी पुरवठ्यासाठी आता Water Tunnel; मुंबई आणि कोलकाता मेट्रो रेल्वेचे काम करणाऱ्या कंपनीची निवड)
मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एमआयडीसी परिसरात सिप्झ कंपनीच्या समोर एक महिला काल रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास रस्ता क्रॉस करत असताना खड्ड्यात पडली. मेट्रोच्या कामासाठी खड्डा खणण्यात आला होता, त्या खड्ड्यावर झाकण टाकले गेले नव्हते. त्या खड्ड्यात पडून महिलेचा मृत्यू झाला. एमएमआरडीएची (MMRDA) बेपर्वाई यातून दिसून येते. काम केल्यानंतर हा रस्ता पालिकेकडे हॅन्ड ओव्हर होणार होता; मात्र मुंबई महानगरपालिका (BMC) के/पूर्व विभागाने मेट्रो 3 लाईनला पत्र लिहून ‘संपूर्ण रस्त्याचा पहिल्या सारखे काम करून मग हँड ओव्हर करा’, असे पत्र दिले होते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान स्थानिक पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी यांनी घटनास्थळावर तात्काळ धाव घेऊन सर्च ऑपरेशन सुरू केले. उपचारांसाठी महिलेला कूपर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान महिलेचा मृत्यू झाला.
मध्यरात्री मुंबई पोलिसांनी ओपन ड्रेनेज झाकण लावून बंद केल्या आहेत. सध्या एमआयडीसी पोलीस गुन्हा दाखल करून चूक नेमकी कोणाची आहे. कोणाच्या चुकीमुळे या महिलाचा बळी गेला आहे, या संदर्भात अधिक तपास करत आहेत. मेट्रो तीन लाईनचे 5 ऑक्टोबरला उद्घाटन आहे; मात्र या उद्घाटना आधी महिलेचा मृत्यू झाला आहे. (Mumbai Rains)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community