या शहरांत २३४ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले

108

ओमायक्रॉनच्या विषाणूने राज्यातील कोरोनाची आकडेवारी वाढतच चालली आहे. रविवारी दिवसभरात मुंबईत आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या २३४ वर दिसून आली. तर राज्यात नव्याने आढळलेले रुग्ण ३२४ एवढे होते. एकट्या मुंबईतच दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांपैकी अर्धे रुग्ण दिसून आले.

मुंबईतच ५० टक्के कोरोना रुग्णांची नोंद

मुंबईतील नव्या नोंदीपैकी २२६ रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणे नव्हती. यापैकी केवळ एका रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासली. एकट्या मुंबईत आता १ हजार २९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईतच ५० टक्के कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने, पालिका यंत्रणा आता चांगलीच कामाला लागली आहे. राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ९०३ वर पोहोचली आहे.

( हेही वाचा: दुरंतो, राजधानी, जनशताब्दी… रेल्वे गाड्यांना नावे कशाच्या आधारे दिली जातात? )

ठाण्यात कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता

मुंबईखालोखाल पुण्यात २८७ आणि ठाण्यात  १८० कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा तीनशे पार पोहोचला असताना, गेल्या आठवड्यापासून पुण्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. परंतु ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या लवकरच २००चा आकडा पार करेल, असा अंदाज आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.