Mumbai मध्ये पुन्हा बोटीचा अपघात; मासेमारी नौकेला मालवाहू जहाजाची धडक

98
Mumbai मध्ये पुन्हा बोटीचा अपघात; मासेमारी नौकेला मालवाहू जहाजाची धडक
Mumbai मध्ये पुन्हा बोटीचा अपघात; मासेमारी नौकेला मालवाहू जहाजाची धडक

मुंबईच्या (Mumbai) अरबी समुद्रात (Arabian Sea) पुन्हा एका बोटीचा अपघात झाला आहे. मढ कोळीवाडा परिसरात हा अपघात झाला असून मासेमारी नौकेला खोल समुद्रात एका मोठ्या मालवाहू जहाजाने टक्कर दिल्याने मासेमारी नौका बुडाली आहे. ही घटना दि. २९ डिसेंबरच्या पहाटे घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. (Mumbai)

( हेही वाचा : Ladki Bahin Yojana मध्ये बांगलादेशी घुसखोर महिलांची ‘घुसखोरी’; कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांचा आरोप

अपघातात बुडालेल्या मासेमारी करणाऱ्या नौकेवरील तांडेल या खलाशाला बाजूला असलेल्या सवटी ग्रुपच्या नौकांनी सुखरुप वर काढले. सवटी ग्रुपच्या (Sawati Group) आठ बोटीने मासेमारी नौकेला बांधून खोल समुद्रातून मढ तळाशी आणले आहे. यासोबत नौदल आणि कोस्ट गार्डचे जहाज बरोबर असून मध्यरात्रीपासून दोन अधिकारी देखील या नौकांची मदत करत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान याआधी दि. १८ डिसेंबर रोजी घारपुरी बेटाकडे (Elephanta Island) निघालेल्या बोटीला भारतीय नौदलाच्या बोटीने दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे समुद्रात पर्यटनासाठी आणि मासेमारीसाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Mumbai)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.