मुंबई सायन-पनवेल (Mumbai- Sion Panvel Road) मार्गावरुन प्रवास करणा-यांसाठी महत्त्वाची बातमी. वाशी खाडीपूल गेल्या तासाभरापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलावर वाळूचा ट्रक पलटी (sand truck Accident) झाल्याने वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली आहे. वाळू रस्त्यावर पसरल्याने वाशीचा खाडीपूल एक तासापासून बंद आहे. यामुळे मुंबईला जाणा-या मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास 3 किमी इतक्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
ट्रक पलटी झाल्याने रस्ता बंद
सकाळी रेती घेऊन जाणारा ट्रक वाशी खाडी पुलावर पलटी झाल्याने हा रस्ता बंद करण्यात आला आहे. घटनास्थळी वाहतूक पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. JCB च्या साहाय्याने रेती काढण्याचे काम सुरु आहे. यासाठी पाण्याचा फव्वारा मारुन अग्निशमन दलदेखील रस्ता मोकळा करण्याचे काम करत आहे. पुढील काही वेळात रस्ता मोकळा होऊन वाहतूक पूर्ववत होईल, अशी माहिती वाहतूक पोलीसांनी दिली आहे.
( हेही वाचा: पुणे रेल्वे स्थानक बाॅम्बने उडवण्याची धमकी; पोलीस यंत्रणा सतर्क )
Join Our WhatsApp Community