Mumbai Slums Free : बाळासाहेबांच्या नातवाला नकोय झोपडपट्टीमुक्त मुंबई

पियुष गोयल म्हणतात झोपडपट्टीमुक्त मुंबई, आदित्य ठाकरे म्हणतात हा भाजपाचा डाव

291
Mumbai Slums Free : बाळासाहेबांच्या नातवाला नकोय झोपडपट्टीमुक्त मुंबई
Mumbai Slums Free : बाळासाहेबांच्या नातवाला नकोय झोपडपट्टीमुक्त मुंबई
विशेष प्रतिनिधी,मुंबई

मुंबई झोपडपट्टी मुक्ततेचा (Mumbai Slums Free) स्वप्न ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackray) यांनी पाहिले होते, त्याच बाळासाहेबांच्या नातवाकडून आता झोपडपट्टीमुक्त मुंबईला विरोध होत आहे. मुंबई झोपडपट्टीमुक्त (Mumbai Slums Free) करण्यासाठी याचा प्रयोग उत्तर मुंबईतून करण्याची इच्छा उत्तर मुंबईचे लोकसभा उमेदवार पियुष गोयल यांनी व्यक्त केल्यानंतर याला शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आक्षेप घेतला. पियुष गोयल यांच्या विधानाचा अर्थ काढत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी या झोपडपट्टीधारकांना मिठागराच्या जागेवर नेऊन सोडायचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. ही भीतीदायक योजना मुंबईत आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे झोपडपट्टीमुक्त (Mumbai Slums Free) मुंबईचे स्वप्न भाजपने रंगवल्यानंतर याला विरोध दर्शवत एकप्रकारे आदित्य ठाकरेंनी आपल्या आजोबांच्या स्वप्नातील मुंबईला विरोध दर्शवल्याचे बोलले जात आहे.

मुंबईला झोपडपट्टीमुक्त बनवायचे

उत्तर मुंबई लोकसभेचे भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मनात इच्छा होती की कसे मुलाखतीमध्ये आपल्या मनात भारत झोपडपट्टी मुक्त आणि विशेषत: मुंबईला झोपडपट्टीमुक्त (Mumbai Slums Free) बनवायची इच्छा माझ्या मनात काय होती. त्यामुळेच उत्तर मुंबईत हा प्रयोग करण्याचा विचार केला आहे. उत्तर मुंबईला झोपडपट्टी मुक्त (Mumbai Slums Free) बनवायचे. ही मोठी समस्या आहेत. पण पंतप्रधान म्हणतात लाखो समस्या येणार, पण त्यामुळे कोटयवधी लोकांचे समाधान होणार आहे. त्यामुळे झोडपट्टीमुक्त मुंबईच्या दृष्टीकोनातून हा प्रयोग उत्तर मुंबईत करणार, जेणेकरून सर्वप्रकारची सोयी सुविधा मुलांना मिळतील आणि येणाऱ्या पिढीचेही जीवन चांगले होईल,असे या क्षेत्राला बनवायचे असे इच्छा त्यांनी मुलाखतीद्वारे व्यक्त केली.

(हेही वाचा – North Mumbai Constituency : शिवसेनेची मोर्चेबांधणी जोरात सुरु, काँग्रेसमध्ये निरुत्साह,)

हा मुंबईचा अपमान

मात्र, या मुलाखतीतील विधानाचा सोयीनुसार अर्थ काढत शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील सर्व झोपडपट्या या काढून टाकायच्या आणि त्यांना मिठागराच्या जागेवर नेऊन टाकायचे,ह ही भीतीदायक योजना आहे. अनेक कुटुंबे झोपडपट्टी राहतात, त्यांचे रोजगार हे रोजगार आजूबाजुलाच असतात. पण मिठागराची जागा आहे, तिथे भाजपाला सोय करायची आहे. हेच उमेदवार तेव्हा मिठागर विभागाचे मंत्री होते आणि त्यांना आम्ही मेट्रो कारशेडसाठी जागा मागत होतो,पण त्यांनी दिली नाही,असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे हा मुंबईचा अपमान असून भाजपाचे गरीबी हटाव नव्हे तर गरीब हटाव असल्याचा आरोप त्यांनी केला.

बाळासाहेबांच्या स्वप्नातील ही योजना

सन १९९५मध्ये राज्यात शिवसेना भाजपा युतीचे सरकार आल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackray) यांनी झोपडपट्टीमुक्त मुंबईचे स्वप्न पाहून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मुंबईत एसआरए योजना राबवण्यात येत आहे. परंतु बाळासाहेबांच्या स्वप्नातील ही योजना मुंबईत पूर्णपणे अपयश ठरली आहे. परंतु आता हेच स्वप्न आता भाजपाने पाहिल्यानंतर याची सुरुवात उत्तर मुंबईतून करण्याचा निर्धार भाजपाने केला आहे.

उबाठा गटाच्या पोटात दुखण्याचे कारण काय ?

दरम्यान, झोपडपट्टीमुक्त मुंबई झाली तरी उबाठा गटाच्या पोटात दुखण्याचे कारण काय असा सवाल मुंबई भाजपाने एक्सदवारे केला आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या सामान्य मुंबईकरांना मुंबईतच सर्व सोयीसुविधा मिळणार असे पियुष गोयल यांनी स्पष्ट सांगूनही बाळराजे मात्र, आमच्या मुंबईतील गरीबांची थट्टा करायला पुढे सरसावले आहेत. . .! अशा शब्दांत मुंबई भाजपाने आदित्य ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.