26 सप्टेंबरपासून मुंबईत रिक्षा-टॅक्सी चालक संपावर

परिवहन मंत्री उदय सामंत यांनी दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप करत मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांनी पुन्हा एकदा 26 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला. दिवसेंदिवस होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे टॅक्सी आणि रिक्षाचालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उत्पन्नातील जास्तीत जास्त पैसे हे सीएनजी भरण्यासाठी जात असल्याने भाडेवाढ मिळावी, या मागणीसाठी मुंबई टॅक्सी चालक 15 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत होते. परिवहन मंत्र्यांनी आश्वासन दिल्याने हा संप तेव्हा स्थगित केला होता.

भाडे 25 रुपयांवरून 35 रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी

मात्र मंत्री उदय सामंत यांनी बैठकीत दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांनी पुन्हा एकदा बेमुदत संपावर जाणार असल्याचे जाहीर केले आहे. मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने परिपत्रक काढत हा निर्णय जाहीर केला आहे. रिक्षा-टॅक्सी युनियन आणि सरकारमध्ये यासंदर्भात वारंवार बैठका झाल्या. पत्रव्यवहार झाला मात्र सरकार आश्वासन देते, तोडगा काहीच नाही. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी चालक आता आंदोलन करणारच या भूमिकेत आहेत. टॅक्सी युनियनने भाडे 25 रुपयांवरून 35 रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आधीच महागाई, त्यात भाडेवाढीने अधिक मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे. भाडेवाढ व्हावी यासाठी रिक्षा टॅक्सी आंदोलन करणार आहेत.

(हेही वाचा गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना घरचा अहेर, मेळाव्यात उपस्थित राहून केले शिंदेंच्या भूमिकेचे समर्थन)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here