वर्षभरात सीएनजीची किंमत 48 रुपयांवरुन 80 रुपये प्रतिकिलो झाली आहे. त्यामुळे टॅक्सीचालकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असून, टॅक्सी भाड्यात 10 रुपये वाढ करण्यात यावी अन्यथा आम्हाला 1 ऑगस्ट 2022 पासून संपावर जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असा इशारा मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए.एल.क्वाड्रोस यांनी दिला. त्यामुळे येणा-या काळात टॅक्सीभाड्यात 10 रुपये भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षभरात सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 32 रुपयांची दरवाढ झाली आहे. सीएनजीचा दर प्रतिकिलो 48 असताना, टॅक्सीचे कमीत- कमी भाडे 25 रुपये करण्यात आले होते. वर्षभरात सीएनजीची किंमत 48 रुपायांवरुन 80 रुपये प्रतिकिलो झाली आहे. त्यामुळे टॅक्सीचालकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
तत्काळ निर्णय घ्यावा
तत्काळ टॅक्सीचे किमान भाडे 25 वरुन 35 रुपये करण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा आम्हाला 1 ऑगस्ट 2022 पासून संपवार जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. याबाबतचे निवेदन अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) आशिष कुमार सिंह यांना बुधवारी दिले आहे, असे ए. एल. क्वाड्रोस यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community