Badlapur Panvel Tunnel: मुंबई ते पनवेल आता २० मिनिटांत तर, बदलापूर प्रवास फक्त 40 मिनिटांवर!

9447
Badlapur Panvel Tunnel: मुंबई ते पनवेल आता २० मिनिटांत तर, बदलापूर प्रवास फक्त 40 मिनिटांवर!
Badlapur Panvel Tunnel: मुंबई ते पनवेल आता २० मिनिटांत तर, बदलापूर प्रवास फक्त 40 मिनिटांवर!

सध्या बदलापुरवरून (Badlapur Panvel Tunnel) मुंबई किंवा नवी मुंबई गाठायची म्हटले तर लोकल ट्रेनशिवाय पर्याय नाही. मात्र, लोकल ट्रेनचा विलंब आणि गर्दी यामुळे बदलापूर ते मुंबई हा प्रवास अनेकांसाठी नरकयातनांपेक्षा कमी नाही. मात्र, बडोदा ते JNPT (Vadodara Mumbai Expressway) या महामार्गावरील माथेरानजवळच्या बोगद्यामुळे बदलापूरकरांना मोठा फायदा होणार आहे. बदलापूर ते पनवेल असा सव्वा चार किलोमीटर अंतराचा बोगदा हा राज्यातील सर्वात जास्त लांबीचा भुयारी मार्ग ठरणार आहे. हा बोगदा अवघ्या 15 महिन्यांमध्ये तयार करण्यात आला आहे. या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या 10 मिनिटांमध्ये करणे शक्य होईल. तर बदलापूर-पनवेल थेट जोडले गेल्याने अटल सेतूमार्गे बदलापूरकरांना जवळपास 40 मिनिटांत मुंबई गाठणे शक्य होईल.

कसा असेल बडोदा ते जेएनपीटी महामार्ग?
बडोदा ते जेएनपीटी महामार्ग 189 किमी लांब आणि 120 मीटर रूंद असा हा आठ पदरी महामार्ग असेल. महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातील तलासरी ते रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील करंजाडे गावापर्यंत हा महामार्ग असेल. महाराष्ट्रात हा रस्ता अंबरनाथ तालुक्यात बदलापूर शहराजवळून जात असून त्यामुळे बदलापूर शहराला भविष्यात बडोदा आणि जेएनपीटीची थेट कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. (Badlapur Panvel Tunnel)

बदलापूरच्या बेंडशीळ गावाजवळ सध्या या रस्त्याचं काम जोरात सुरू आहे. जानेवारी 2025 पर्यंत बोगद्याचं काम पूर्ण होईल असा अंदाज आहे. तर जून 2025 पर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचं उद्दिष्ट आहे. या महामार्गावर जाण्यासाठी कल्याण तालुक्यातील रायते आणि बदलापूरच्या दहिवली गावातून इंटरचेंज असेल. याशिवाय, मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गही या महामार्गाला जोडलेले असतील. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूरमधील प्रवाशांना नवी मुंबई, पालघर, गुजरात, नाशिक, नागपूर या सर्व ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगवान आठ पदरी महामार्ग उपलब्ध होणार आहे. (Badlapur Panvel Tunnel)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.