मुंबई – बलिया आणि मुंबई – गोरखपूर या विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे मुंबई – बलिया आणि मुंबई – गोरखपूर दरम्यान चालणाऱ्या विशेष गाड्यांचा कालावधी पुढीलप्रमाणे वाढवित आहे.

( हेही वाचा : दादर रेल्वे स्थानकाचे रस्ते फेरीवालामुक्त, महापालिका आणि पोलिसांची विशेष धडक मोहीम )

१. मुंबई – बलिया त्रि-साप्ताहिक विशेष (५४ फेऱ्या)

01025 लोकमान्य टिळक टर्मिनस – बलिया विशेष आता १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी (२७ फऱ्या) चालवण्यासाठी वाढवण्यात आली आहे. तसेच 01026 बलिया – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष आता ३.ऑगस्ट ते २ ऑक्टोबरपर्यंत दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी (२७ फेऱ्या) चालवण्यासाठी वाढवण्यात आली आहे.

२. मुंबई – गोरखपूर आठवड्यातून ४ वेळा विशेष (७२ फेऱ्या)

01027 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर विशेष आता २ऑगस्ट ते २ ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी (३६ फेऱ्या) चालवण्यासाठी वाढवण्यात आली आहे. तसेच 01028 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष आता १ ऑगस्ट ते १ ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी (३६ फेऱ्या) चालवण्यासाठी वाढवण्यात आली आहे.दोन्ही विशेष गाड्यांच्या थांब्या आणि वेळेत कोणताही बदल नाही.

दोन्ही विशेष गाड्यांची सुधारित संरचना

एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान क्लास, २ ब्रेक व्हॅनसह ५ सामान्य द्वितीय श्रेणी.आरक्षण : विशेष ट्रेन क्रमांक 01025 आणि 01027 साठी विशेष शुल्कासह बुकिंग २९जुलै रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here