मुंबई ते नवी मुंबई प्रवास होणार सुसाट! वॉटर टॅक्सी सेवा सुरू, किती असणार भाडे?

181

मुंबईहून बेलापूरला अवघ्या एक तासांमध्ये पोहोचणे आता शक्य होणार असून गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर दरम्यानच्या वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. मुंबई बंदर प्राधिकरणाने नयनतारा शिपिंग कंपनीला लग्झरी क्रुझ सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया या वॉटर टॅक्सीच्या पहिल्या फेरीचे उद्घाटन बंदर विकास मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.

( हेही वाचा : IRCTC ई-कॅटरिंग : PNR टाका आणि व्हॉट्सअ‍ॅपवर ऑनलाइन जेवण मागवा! काय आहे रेल्वेची भन्नाट योजना  )

दक्षिण मुंबईतून नवी मुंबईत पोहोचण्यासाठी २ तासांचा वेळ लागतो. खासगी कॅब केल्यास ५०० ते ६०० रुपये खर्च येतो. तसेच ट्रॅफिकमुळे सुद्धा प्रवाशांची कोंडी होती. परंतु या नव्या जलमार्गामुळे दक्षिण मुंबई ते नवी मुंबई हे अंतर कमी होणार आहे. या टॅक्सीचे दर ३५० रुपये आहे. एका वॉटर टॅक्सीमधून २०० जण प्रवास करू शकतात.

वॉटर टॅक्सीचे तिकीट दर किती आहे?

  • वॉटर टॅक्सी लोअर डेक भाडे – २५० रुपये
  • अपर डेकचे भाडे – ३५० रुपये

फेऱ्यांच्या वेळा

  • बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया – सकाळी ८.३० वाजता
  • गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर – सायंकाळी ६.३० वाजता
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.