अबब…दिल्लीसाठी माथेरानमधून बोगदा, लांबी ऐकून थक्क व्हाल

113

सध्या चर्चेत असलेला दिल्ली-उरण जेएनपीटी महामार्ग आता आणखी एका मुद्यावरून चर्चेत आला आहे. या मार्गामध्ये एक भला मोठा बोगदा खोदण्यात येणार आहे आणि तो चक्क माथेरानच्या डोंगराखालून खोदण्यात येणार आहे. यामुळे एका बाजूला इकोसेन्सेटिव्ह झोन असलेल्या माथेरानच्या खालून मात्र दिवस-रात्र वाहनांची वर्दळ दिसणार आहे.

४.३९ किमी लांबीचा असणार बोगदा

दिल्लीला मुंबईशी जोडणारा हा महामार्ग सुमारे १ हजार ३५० किमी लांबीचा आहे. यामुळे १२ तासांत मुंबई वरून दिल्ली गाठता येणार आहे. ह्या महामार्गासाठी माथेरान येथून बोगदा खोदण्यात येणार आहे. तो ४.३९ किमी लांबीचा असणार आहे. पर्यावरण खात्याने परवानगी देताच या बोगद्याच्या कामाचे कंत्राटही देण्यात आले आहे. ८ पदरी हा बोगदा असणार आहे. या महामार्गासाठी १ लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. हा महामार्ग सवार्ड माधोपूर, कोटा, रतलाम, बडोदा, सुरत, ठाणे आणि नवी मुंबई या शहरांना हा महामार्ग जोडणार आहे. दिल्लीत ९ किमी, हरियाणा १२९ किमी, राजस्थान २७३, मध्य प्रदेश २४४, गुजरात ४२६ आणि महाराष्ट्र १७१ किमी पर्यंत असणार आहे. दरम्यान आता प्रशासनासमोर या महामार्गासाठी जमीन संपादन करण्याचे मोठे आव्हान उभे आहे.

(हेही वाचा मरणानंतरही मृतदेहाची हेळसांड)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.