मुंबई ते लोणावळा फक्त दीड तासात! प्रवासाचा वेळ वाचणार, तयार होणार कॉरिडॉर

227

वाहतूककोंडी व ट्रान्सहार्बर लिंकवरील ताण कमी करण्यासाठी चिर्ले टोकापासून ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्गापर्यंत ७ किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर एमएमआरडीएचा प्रस्ताव आहे. त्यामुळे मुंबई, लोणावळा व खंडाळा दरम्यानचा प्रवास ९० मिनिटांनी कमी होणार आहे. त्यामुळे मुंबई ते लोणावळा हे अंतर केवळ दीड तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे.

( हेही वाचा : धूम्रपान करू नका सांगितल्यावर माथेफिरूने थेट विमानाचा दरवाजा उघडण्याचा केला प्रयत्न! पुढे घडले असे… )

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गाशी जोडण्यात येणाऱ्या प्रस्तावित १३५२ कोटी खर्चाच्या कामामुळे या मार्गावरील वाहतूक आणखी सुलभ होईल अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकणाकडून देण्यात आली आहे.

MMRDA च्या माध्यामातून चिर्ले टोकापासून – गव्हाण फाटा- पळस्पे फाटा ते मुंबई पुणे महामार्गापर्यंत हा एलिव्हेटेड कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. हा एलिव्हेटेड रस्ता मुंबई पुणे महामार्गाला कनेक्टिव्हिटी देणारा आहे. यामुळे आता मुंबई ते लोणावळा-खंडाळा या दरम्यानचा प्रवास सोयीचा होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे प्रवासातील ९० मिनिटांचा कालावधी वाचणार असून फक्त दीड तासांमध्ये मुंबईहून या दोन पर्यटनस्थळी भेट देणे शक्य होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.