उन्हाळ्यात अनेकजण गावी जातात, तसेच या कालावधीमध्ये शाळांनाही सुट्ट्या असतात. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने उन्हाळ्याच्या हंगामातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर दरम्यान ३६ साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या सोडल्या आहेत.
( हेही वाचा : आता मिळवा मोफत आरोग्य सेवा! कशी ते वाचा… )
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर साप्ताहिक गाड्या (१८ फेऱ्या)
- गाडी क्रमांक 01033 ही साप्ताहिक अतिजलद विशेष गाडी ९ एप्रिल ते ४ जूनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर शनिवारी मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि नागपूर येथे दुपारी १५.३२ वाजता नागपूर येथे पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01034 ही साप्ताहिक अतिजलद विशेष गाडी १० एप्रिल ते ५ जून पर्यंत दर रविवारी दुपारी १३.३० वाजता नागपूर येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.१० वाजता पोहोचेल.
- थांबे : दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
- संरचना : एक द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी डबे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मालदा टाउन साप्ताहिक गाड्या (१८ फेऱ्या)
- गाडी क्रमांक 01031 ही साप्ताहिक अतिजलद विशेष गाडी ११ एप्रिल ते ६ जून पर्यंत दर सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ११.०५ वाजता सुटेल आणि मालदा टाउन येथे तिसऱ्या दिवशी ००.४५ वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01032 ही साप्ताहिक विशेष गाडी १३ एप्रिल ते ८ जून पर्यंत दर बुधवारी मालदा टाउन येथून १२.२० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ०३.५० वाजता पोहोचेल.
- थांबे : दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, पटना, बख्तियारपूर, किउल, अभयपूर , जमालपूर, सुलतानगंज, भागलपूर, कहलगाव, साहिबगंज, बड़हरवा आणि न्यू फरक्का.
- संरचना : एक द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी डबे
आरक्षण सुविधा
या गाड्यांची बुकिंग संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
Join Our WhatsApp Community