Mumbai Trans Harbour Link : २० मिनिटात मुंबईतून नवी मुंबई करा सुस्साट प्रवास

नवीन वर्षात ट्रान्स हार्बर लिंक सेवेत दाखल होईल असे बोलले जात आहे.

140
Mumbai Trans Harbour Link : २० मिनिटात मुंबईतून नवी मुंबई करा सुस्साट प्रवास
Mumbai Trans Harbour Link : २० मिनिटात मुंबईतून नवी मुंबई करा सुस्साट प्रवास

मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक (MTHL)हा देशातला सगळ्या लांब सागरी. पुलाचे काम ९६ टक्के पूर्ण झाले असून, डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमएमआरडीएने डोळ्यासमोर ठेवले आहे.त्यामुळे लवकरच मुंबईकरांना मोठं गिफ्ट मिळणार आहे. १६.५ किमी लांबीचा हा पूल ओपन रोड टोलिंग प्रणाली (ORT) असलेला भारतातला पहिला पूल असणार आहे. त्यामुळे मध्य मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईतील चिर्ले हा प्रवास अवघ्या १५ ते २० मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे. तर नवीन वर्षात ट्रान्स हार्बर लिंक सेवेत दाखल होईल असे बोलले जात आहे. (Mumbai Trans Harbour Link )

डिसेंबरपर्यंत होणार पूर्णटोलसाठी थांबायची गरज नाही या पुलावरील टोल नाक्यावर ‘ओपन रोड टोलिंग सिस्टीम’ ही प्रणाली वापरण्यात येणार आहे. त्यामुळे टोल बूथवर थांबण्याची, रांग लावण्याची आवश्यकता वाहनचालकांना भासणार नाही. १०० किमी प्रतितास वेगाने वाहन गेले तरी टोलचे पैसे आपोआप कापले जाणार.पुलाला अटल सेतू नाव माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ या पुलाला अटल सेतू असे नाव देण्यात येणार असून या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने सुमारे १८ हजार कोटी मोजले आहेत.

(हेही वाचा : Shortage of Water :राज्यातील १२०० हुन अधिक गावांना टँकरचा आधार)

पुणे, अलिबाग, गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच सोय होणार आहे .तसेच या पुलामुळे थेट रायगड जिल्ह्यात पोहोचता येणार असल्याने जेएनपीटी, पुणे, अलिबाग, गोवा या ठिकाणी जाणाऱ्या वाहनचालकांची सोय होणार आहे. पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असून डिसेंबरमध्ये ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले जाईल, असे एमएमआरडीएतील सूत्रांनी सांगितले.

रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी कमी होणार
लोकांची वाढती गर्दी आणि त्यामुळे रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी हा सागरी पूल तयार करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचा वेळही वाचणार आहे. त्यामुळे भविष्यात लोकांचा मुंबई प्रवास आणखी सुखकर होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.