लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. मुंबईत दादर, शिवाजी पार्क येथे त्यांची जाहीर सभा शुक्रवारी, (१७ मे) होणार आहे. यादरम्यान मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. जाहीर सभेमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत आणि पर्यायी मार्ग वापरण्याबाबत एक सर्वसमावेशक सूचना जारी केली आहे.
In view of a ‘Jahir Sabha’ organised at Shivaji Park, Dadar on 17th May, a large number of individuals & VVIPs are expected to attend it.
To avoid traffic congestion on WEH & EEH following traffic arrangements will be in place from 10 am to midnight.#MTPTrafficUpdates pic.twitter.com/S8IADnimb6
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) May 16, 2024
मुंबई वाहतूक पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेमुळे मुंबईकरांसाठी संभाव्य वाहतूक कोंडीबद्दल तपशीलवार सूचना जारी केल्या आहेत. सकाळी १० वाजल्यापासून वाहतूक व्यवस्था करण्यात येईल. याविषयीची माहिती वाहतूक पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट ‘X’द्वारे शेअर केली आहे.
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: पाकव्याप्त काश्मीर भारताचेच आहे, आम्ही ते घेऊ; अमित शहा यांनी कॉंग्रस नेत्यांवर साधला निशाणा)
“विमान किंवा ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे आधीच नियोजन केले पाहिजे आणि वेळेवर गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी गैरसोय टाळली पाहिजे,” असेही वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे. सभेमुळे दादरमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पर्यायी मार्ग तयार केले आहेत. तर काही मार्ग बंद केले आहेत.
वाहने उभी करण्यास कुठे प्रतिबंध आहे?
1. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग : बाबासाहेब वरळीकर चौक (सेन्च्युरी जंक्शन) ते हरी ओम जंक्शन, माहिम
2. संपूर्ण एम. बी. राऊत मार्ग, शिवाजीपार्क, दादर.
3. संपूर्ण केळूस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर, शिवाजीपार्क, दादर
4. एन. सी. केळकर मार्ग: हनुमान मंदिर सर्कल ते गडकरी जंक्शन, शिवाजीपार्क, दादर.
5. टी. एच. कटारीया मार्ग : गंगाविहार जंक्शन ते आसावरी जंक्शन, माहिम.
6. पांडुरंग नाईक मार्ग, (शिवाजीपार्क रोड नं. ५), शिवाजीपार्क, दादर,
7. दादासाहेब रेगे मार्ग, शिवाजीपार्क, दादर
8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड महेश्वरी सर्कल ते कोहिनूर जंक्शन, दादर (पूर्व)
9. टिळक रोड:- कोतवाल गार्डन सर्कल, दादर (पश्चिम) ते आर. ए. किडवाई रोड, माटुंगा (पूर्व) १२. खान अब्दुल 10. गफारखान रोड सी लिंक गेट ते जे. के. कपूर चौक ते बिंदू माधव ठाकरे चौक.
11. थडानी मार्ग:- पोददार हॉस्पीटल जंक्शन ते बिंदू माधव ठाकरे चौक.
12. डॉ. अॅनी बेझंट रोड पोद्दार हॉस्पिटल जंक्शन ते डॉ. नारायण हर्डीकर जंक्शन.
13. दिलीप गुप्ते मार्ग: शिवाजी पार्क गेट क्र. ४ ते शितलादेवी रोड, शिवाजी पार्क, दादर.
14. एल. जे. रोड : गडकरी जंक्शन, दादर ते शोभा हॉटेल, माहिम.
पर्यायी मार्ग कोणते?
स्वातंत्रवीर सावरकर मार्ग उत्तर वाहिनी – सिध्दिविनायक मंदिर जंक्शन ते येस बँक जंक्शन
पर्यायी मार्ग – सिध्दिविनायक मंदिर जंक्शन उजवे वळण घेऊन एस. के. बोले रोड, आगार बाजार,
पोतुर्गीज चर्च, डावे वळण गोखले रोड किंवा एस. के. बोले मार्ग या रस्त्यांचा वापर करावा.
स्वातंत्रवीर सावरकर मार्ग दक्षिण वाहिनी येस बँक जंक्शन ते सिध्दिविनायक मंदिर जंक्शन
पर्यायी मार्ग दांडेकर चौक येथे डावे वळण घेऊन पांडूरंग नाईक मार्गे राजाबढे चौक येथे उजवे वळण घेवून एल. जे. रोडमार्गे गोखले रोड किंवा एन. सी. केळकर रोड या रस्त्यांचा वापर करावा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community