Western Express highwayवर प्रचंड वाहतूक कोंडी; सर्वसामान्यांना नाहक त्रास

मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर (Western Express Highway ) प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळपासून ही वाहतूक कोंडी झाली आहे. मालाड कुरारपासून ते जोगेश्वरी दरम्यान ही वाहतूक कोंडी झाली आहे. या दरम्यानच्या काही भागांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. तर, काही भागांमध्ये वाहनांची रहदारी संथगतीने सुरु आहे. सकाळीच झालेल्या या वाहतूक कोंडीने सामान्यांना कामावर लेट मार्क लागला आहे.

( हेही वाचा: मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय; जितेंद्र आव्हाडांचं ट्विट )

वाहतूक कोंडीचा सामन्यांना फटका

वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हा वर्दळीचा मार्ग आहे. विलेपार्ले, दादर, चर्चगेटच्या दिशेने जाणा-या नोकरदार, सामान्यांची संख्या मोठी असते. या महामार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे. मात्र, सोमवारी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. गोरेगाव येथील विरवाणी इस्टेटपासून ते हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटर रुग्णालयापर्यंतच्या सिग्नलपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोडींत अनेक वाहने अडकली आहेत. बेस्ट बसेस, रिक्षादेखील वाहतूक कोंडीत अडकल्याने सामान्यांना त्याचा फटका बसला आहे. मेट्रोचे काम सुरु असल्याने ही वाहतूक कोंडी झाली असल्याचे म्हटले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here