रविवारची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात. या सुट्टीच्या दिवशी कुठेतरी फिरण्याचा अनेकांचा बेत असतो. पण, या येत्या रविवारी मात्र तुम्ही वाहन घेऊन बाहेर फिरण्यासाठी जाणार असाल, तर मुंबईतले 13 रस्ते हे 3 तासांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.
मुंबईकरांनीही केले स्वागत
पायलट प्रोजेक्ट म्हणून मुंबईचे वाहतूक पोलीस एक अनोखा उपक्रम सुरू करणार आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्त संजय पांडे यांनी मुंबई पोलीस आणि नागरिकांसाठी एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे. नागरिकांना पाहण्यासाठी किंवा उपक्रमात सहभागी होण्यासाठी हे रस्ते खुले असतील. यावेळी तुम्ही रस्त्यावर चालणे, सायकलिंग, स्केटिंग, योगासने करू शकता. मुले रस्त्यावर खेळूही शकतात. या खास उपक्रमाचं मुंबईकरांकडूनही स्वागत करण्यात आलं आहे.
( हेही वाचा: रशिया -युक्रेन सीमेवर ‘ती’ रहस्यमयी विमानं कोणाची..महासत्ता उतरतेय युद्धात ? )
नागरिकांसाठी रस्ता खुला
या अनोख्या उपक्रमासाठी मुंबईतील जे १३ रस्ते बंद करण्यात आले आहेत, त्या १३ रस्त्यांमध्ये मरीन ड्राइव्ह, वांद्रे बँडस्टँड, ओशिवरा, बोरिवली आणि मुलुंड यांचा समावेश आहे. रविवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत हे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून, फक्त नागरिकांसाठी खुले असणार आहेत.
Join Our WhatsApp Community