बुधवार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी टिटवाळा स्टेशन दरम्यान गीतांजली एक्स्प्रेसमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गीतांजली एक्स्प्रेस रखडल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. इंजिनमधील बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र यामुळे कल्याणकडून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद आहे. तसेच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. (Mumbai Local)
(हेही वाचा – हिंदु राष्ट्र कायम ठेवायचे असेल, तर मोदींनी योगींकडे सत्ता सोपवावी; Sharad Ponkshe यांचे परखड प्रतिपादन)
सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गीतांजली एक्स्प्रेसच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. टिटवाळा स्टेशनदरम्यान एक्स्प्रेस रखडल्यामुळे अनेक लोकल गाड्याही अडकल्या आहेत. तसेच कल्याणकडून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
मध्य रेल्वेवर एक्स्प्रेस गाड्या अधिक असल्याने तेथील लोकलला सातत्याने उशीर होणे, लोकल गाड्या रद्द होणे, अचानक प्लॅटफॉर्म बदलणे यांमुळे प्रवासी त्रस्त असतात. अशातच सकाळच्या ऐन कार्यालयीन वेळेत एक्स्प्रेसमध्ये बिघाड झाल्याने नोकरदार वर्गाला मनस्ताप सहन करावा लागतो. (Mumbai Local)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community