दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई शहरांना जोडून मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्यातील प्रगतीचा द्योतक ठरणाऱ्या सुमारे 22 किमी लांबीच्या मुंबई ट्रान्स हार्बर (Trans harbor) लिंक प्रकल्पाच्या प्रगतीची पाहणी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी केली. यावेळी प्रकल्पातील उर्वरित कामे गुणवत्तेसह झपाट्याने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. हा प्रकल्पामुळे नवी मुंबई सह प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदर, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गासह विविध महत्त्वाच्या ठिकाणी जलद पोहोचता येणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशाच्या सर्वांगीन विकासासाठी आणि समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सद्यस्थितीत प्रकल्पाचे 96.60 टक्के कामे पूर्ण झाली असून विद्युत खांबाच्या उभारणीचे काम सुरु आहे. या प्रकल्पात एकूण 1212 विद्युत दिव्यांच्या खांबांची उभारणी केली जाणार असून त्यातील 20 % खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. या खांबांवरील विद्युत दिवे हे केंद्रीय नियंत्रण आणि देखरेख प्रणालीव्दारे नियंत्रित केले जाणार आहेत. हे खांब सागरी क्षेत्रातील हवामानाच्यादृष्टीने निर्माण होणाऱ्या आव्हानावर मात करतील अशा पद्धतीने निर्माण कऱण्यात आले आहे. विशेषतः खारट वातावरणात त्यांची उपयुक्तता, गंज-मुक्त पॉलीयुरेथेन लेप, गंज टाळण्यासाठी आणि आयुष्य वाढवण्यासाठी गॅल्वनायझेशन, जोरदार वाऱ्याच्या वेगाशी सामना करण्यासारख्या आव्हानांना तोंड देणारी संरचनात्मक रचना आणि संपूर्ण पुलावर एकसमान प्रदीपन यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, या खांबांना वीज अवरोधक यंत्रणा बसवण्याची सोय करण्यात आली आहे.
(हेही वाचा Vaibhav Raut : नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात आरोपी वैभव राऊत यांना जामीन मंजूर)
Join Our WhatsApp Community