मुंबई बीए व्हेरिएंटचा ठरतेय हॉटस्पॉट 

95

राज्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी नियंत्रणात ठेवण्यास आरोग्य यंत्रणेला यश येत असले तरीही मुंबई आता बीए व्हेरिएंटचा हॉटस्पॉट ठरत असल्याची, भीती व्यक्त केली जात आहे. रविवारी मुंबईत बीए व्हेरिएंटचे पाच नवे रुग्ण सापडले. शनिवारपासून मुंबईत तब्बल २८ बीए व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत. दोन दिवसांत मुंबईत ८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानेही मुंबईतील आरोग्य व्यवस्थेला नवे आव्हान उभे राहिले आहे.

( हेही वाचा: ‘मित्र संपवले, राऊतांसारखा प्रवक्ता कुठल्याही पक्षाला मिळू नये’, शिंदे गटाने व्यक्त केली नाराजी )

रविवारी मुंबईत बीए व्हेरिएंटचे ३ आणि बीए व्हेरिएंट ४चे २ रुग्ण 

मुंबईत वाढत्या बीए व्हेरिएंटचा अहवाल स्थानिक पालिका आरोग्य विभागाकडून दिला जात असला तरीही अहवालाचे पुनरावलोकन पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलोजी या संस्थेने केला आहे. मुंबईतील वाढत्या बीए व्हेरिएंटच्या अहवालातील रुग्णांची तपासणी १० जूनपासून ते गेल्या आठवड्यात घेतली गेली होती. आतापर्यंत राज्यात एकूण ५४ बीए व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत.
राज्यात आतापर्यंत जिल्हानिहाय आढळलेले बीए व्हेरिएंटचे रुग्ण –
पुणे – १५, मुंबई – ३३, नागपूर – ४, ठाणे – २
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.