![Mumbai Under Water: २०४० पर्यंत दहा टक्के मुंबई पाण्याखाली जाणार? जाणून घ्या तज्ज्ञांनी कारणही सांगितले](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2024/08/New-Project-2024-08-02T192317.973-696x377.webp)
ग्लॉबल वॉर्मिंगचा (Global warming) फटका संपूर्ण जगाला बसत आहे. वेळी अवेळी पाऊस, उन्हाळ्यात तापमान वाढ अशा प्रकारच्या घटना संपूर्ण जगभरात घडत आहेत. समुद्राच्या पाणीपातळीत देखील वाढ होत असल्याचे समोर आले आहे. समुद्राच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास त्याचा धोका मुंबईला बसू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. समुद्राची पाणी पातळी अशी वाढत चालली तर मुंबईचा १० टक्के भूभाग पाण्याखाली जाईल, असा इशारा एका नवीन अभ्यासातून देण्यात आला आहे. पणजी आणि चेन्नईलाही असा धोका संभवत असल्याचे पुढे आले आहे. (Mumbai Under Water)
(हेही वाचा – एसी आणि एसटी आरक्षणासंबंधी Supreme Court च्या निर्णयाला सदावर्ते आव्हान देणार)
हवामान बदलामुळे समुद्राची पाणीपातळी वाढत असल्यामुळे २०४० पर्यंत मुंबईतील १० टक्क्यांहून अधिक जमीन पाण्याखाली (Over 10 percent of Mumbai’s land under water by 2040) जाण्याचो शक्यता आहे. तसेच, भारतातील किनारपट्टीवरील शहरांनाही समुद्राच्या वाढत्या पाणीपातळीचा धोका असल्याचा इशारा बंगळूर येथॉल सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अॅष्ठ पॉलिसीच्या (सीएसटीईपी) अभ्यासात देण्यात आला होता. (Mumbai Under Water)
(हेही वाचा – Narayan Rane यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका; म्हणाले, PM Narendra Modi यांना चॅलेंज देण्याची तुमची… )
हवामान बदलामुळे (Climate change) भारतीय किनारपट्टीवरील १५ शहरांमध्ये भूतकाळात आणि भविष्यात झालेल्या परिणामांचा सीएलटीईपी ने अभ्यास केला. त्यात ये मुंबई, तिरुअनंतपुरम, कोची, मंगलोर, विशाखापट्टणम, कोझिकोडे, हल्दिया, कन्याकुमारी, परानी, पुरी, उद्त्री, पारा मुकुडी आणि यानम या शहरांतील पर्यावरणीय बदलांची निरीक्षणे नोंदविण्यात आली. तसेच यात मुंबईला सर्वाधिक धोका असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. समुद्र पातळीमध्ये होत असलेल्या वाढीमुळे जल, कृषी, वन, जैवविविधता आणि आरोग्य विभागावर परिणाम होण्याची भीतीही अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे (Mumbai Under Water)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community