Colaba-Vandre-Seepz Metro : मुंबई अंडरग्राऊंड मेट्रोतही मोबाईल रिचेबल

या मार्गिकेचा आरे ते बीकेसी (Aare te BKC)हा पहिला टप्पा डिसेंबरपासून सुरू होणे अपेक्षित आहे.

154
Colaba-Vandre-Seepz Metro : मुंबई अंडरग्राऊंड मेट्रोतही मोबाईल रिचेबल
Colaba-Vandre-Seepz Metro : मुंबई अंडरग्राऊंड मेट्रोतही मोबाईल रिचेबल

आपण ट्रेन मधुन प्रवास करत असताना कधी गाडी बोगद्यात गेली तरी अनेकवेळा फोन बोलता बोलता कट होतो. किंवा आपल्या मोबाईलचे इंटरनेट(internet) जाते अशा अनेक गोष्टी नेहमी घडत असतात. मात्र आता मुंबईमध्ये भूमिगत मेट्रो (Mumbai Under ground railway) मार्गिकेतून प्रवास करणाऱ्यांना विनाअडथळा मोबाइलला नेटवर्क उपलब्ध होणार आहे. ही सेवा कुलाबा-वांद्रे-सीप्झ (Colaba-Vandre-Seepz Metro )म्हणजे आरे ते कफ परेड (cuff parade) या भूमिगत मेट्रो मार्गिकेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे यासाठी जमिनीखाली २० मीटर खोलीपर्यंत अँटेना बसविले जाणार आहेत. या मार्गिकेचा आरे ते बीकेसी (Aare te BKC)हा पहिला टप्पा डिसेंबरपासून सुरू होणे अपेक्षित आहे.

जमिनीखालून प्रवास करताना मोबाइल तसेच इंटरनेट वापरता यावे, यासाठी ‘एमएमआरसी’ने सौदी अरेबियामधील रियाध शहरातील ‘एसेस’ या कंपनीच्या एसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपनीला निविदा प्रक्रियाद्वारे कंत्राट दिले आहे. यामुळे मेट्रो ३ मार्गिकेवरील मेट्रो जरी भूमिगत असली तरी प्रवाशांना मोबाइल आणि इंटरनेट सेवा वापरता येणार आहे. मेट्रो ३ ही राज्यातील पहिली भूमिगत मेट्रो मार्गिका आहे. मार्गिकेचा पहिला टप्पा आरे ते बीकेसी असा असेल. या मार्गिकेतील तिकीट खिडक्या जमिनीच्या खाली १०.१४ मीटर तर प्रत्यक्ष स्थानकांचे फलाट हे जमिनीच्या खाली १८ ते २० मीटर खोलीवर आहेत. त्यामुळे भुयारी मार्गात मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा उपलब्ध करणे, हे या मार्गिका उभी करणाऱ्या प्रकल्पातील एक महत्त्वाचे आव्हान होते.

(हेही वाचा : Iit Canteen : आयआयटी कँण्टीनमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांना बसण्याची स्वतंत्र सोय, मेस काउन्सिलकडून उपाययोजना)

यासाठीच ही मार्गिका उभ्या करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सौदी अरेबियाच्या कंपनीशी करार केला आहे. प्रवाशांना नेटवर्क कनेक्टिव्हिटीची सेवा मिळणे सुरू होईल. अशा परिस्थितीत मेट्रोमध्ये प्रवास करताना प्रवाशांना कोणताही अडथळा न येता मोबाइल आणि लॅपटॉपचा वापर करता येईल. मेट्रोमध्ये प्रवास करताना प्रवाशांना त्यांचा मोबाईल आणि लॅपटॉप कोणत्याही व्यत्ययाशिवाय वापरता येणार आहे. प्रवासी सर्व अपडेट्स मिळवू शकतात आणि ऑनलाइन व्यवहार सहज करू शकतात. (Colaba-Vandre-Seepz Metro )

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.