विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात ३० जानेवारीला मतदान होणार आहे. तसेच मुंबई विद्यापीठाच्या ३० जानेवारीला परीक्षा नियोजित करण्यात आल्या होत्या. पण त्यानंतर या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी प्राध्यापक, शिक्षक आणि संस्थाचालक संघटनांनी केली होती. हीच मागणी विद्यापीठ प्रशासनाकडून मान्य करण्यात आली असून मुंबई विद्यापिठाच्या ३० जानेवारीला नियोजित केलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या नियोजित परीक्षा ७ फेब्रुवारीला होणार आहे.
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा कोकण शिक्षक मतदारसंघात समावेश आहे. माहितीनुसार या मतासंघात ३४ हजारांहून अधिक शिक्षक मतदान करणार आहेत. तसेच अनेक शाळा-महाविद्यालयात मतदार केंद्र उभारणार आहेत. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांची अडचण होण्याची शक्यता असल्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.
आता शिक्षक आणि संस्थाचालक संघटनांनी केलेल्या या मागणीला मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन ३० जानेवारीला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आणि ७ फेब्रुवारीला मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा होणार आहेत. एकूण ३० परीक्षा विधि, अभियांत्रिकी, एमएससी चौथे सत्र, वाणिज्य एमकॉम भाग एक आणि अन्य संबंधित अभ्यासक्रमांच्या घेण्यात येणार आहेत.
(हेही वाचा – माजी मुख्यमंत्र्यांचा टोमणे मारणं हाच पराक्रम; मुनगंटीवारांची उद्धव ठाकरेंवर टीका)
Join Our WhatsApp Community