मुंबई विद्यापीठाचा ‘विक्रमी’ दर्जा!

मुंबई विद्यापीठाने सर्वाधिक गुण मिळवत, अ ++ श्रेणीची हॅट्रीक करत हा विक्रम आपल्या नावे केला आहे.

आपल्या विद्यापीठाला नॅशनल असेसमेंट अॅण्ड अॅक्रिडिटेशन काउन्सलकडून ( NACC) अ+ दर्जा मिळावा, अशी प्रत्येक विद्यापीठाची अपेक्षा असते. मुंबई विद्यापीठ नेहमीच आपल्या उत्तम कामगिरीसाठी ओळखलं जातं. आता मुंबई विद्यापीठाने आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे. मुंबई विद्यापीठाने सर्वाधिक गुण मिळवत, अ ++ दर्जा मिळवण्याची हॅट्रूीक करत हा विक्रम आपल्या नावे केला आहे.

जागतिक पातळीवर मुंबई विद्यापीठाला सन्मान प्राप्त करून देण्यासाठी विद्यापीठाने सर्वतोपरी प्रयत्न केले होते. मुंबई विद्यापीठाला नॅकचा अ++ श्रेणीचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. यासाठी विद्यापीठाला ३.६५ सर्वाधिक गुण मिळाले आहेत. राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत सर्वाधिक गुण मुंबई विद्यापीठाने मिळवले आहेत.

(हेही वाचा : मूठभर मूर्ख नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कार्य कधीही मिटवू शकत नाहीत! फडणवीसांचा हल्लाबोल)

सात वर्षांसाठी मुदतवाढ

सर्वाधिक गुण मिळवणारे मुंबई विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. विद्यापीठास २००१ ला ‘पंचतारांकित श्रेणी’  दिली गेली, त्यानंतर २०१२ ला विद्यापीठाला ‘अ’श्रेणी प्राप्त झाली होती, यावर्षी तिसऱ्यांदा सर्वाधिक गुणांकनासह विद्यापीठाला अ++ श्रेणी प्राप्त झाली. NAAC मूल्यांकनानंतर ही मुदतवाढ सर्वसाधारणपणे पाच वर्षांची असते, परंतु सर्वोच्च गुणवत्तेच्या निकषानुसार मुंबई विद्यापीठाला पाच ऐवजी सात वर्षांसाठी राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्ययन परिषदेकडेकडून मुदतवाढ मिळाली आहे. यानुसार, आता मुंबई विद्यापीठाकडे २०२८ पर्यंत नॅकचा अ++ दर्जा असणार आहे. यावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी देखील आनंद व्यक्त केला, तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा मिळलेल्या NAAC मानांकनबद्दल मुंबई विद्यापीठाच्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here