एमबीए, एमसीए करायचंय ? मग ही बातमी नक्की वाचा

या दोन्हीही अभ्यासक्रमांना युजीसीबरोबरच एआयसीटीईचीही मान्यता मिळाली आहे.

78

मुंबई विद्यापीठाला अलिकडेच नॅकचे उत्कृष्ट मूल्यांकन प्राप्त झाले आहे. नॅककडून सर्वाधिक गुण मिळवणारे मुंबई विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. याच पार्श्वभूमीवर २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी मुंबई विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन संस्थेच्या(आयडॉल) १७ नव्या अभ्यासक्रमांना यूजीसीने नुकतीच मान्यता दिली आहे. मागील वर्षी पंधरा अभ्यासक्रमांना यूजीसीमार्फत परवानगी देण्यात आली होती. कोरोना प्रादुर्भावामुळे यूजीसीने शैक्षणिक वर्षाची सुरुवात नोव्हेंबर पासून करण्याचे योजले आहे.

हे आहेत नवे अभ्यासक्रम

यंदाच्या वर्षी यूजीसीने आयडॉलच्या एमए भूगोल आणि एमएमएस (एमबीए) या नवीन अभ्यासक्रमांस परवानगी दिली आहे. एमएमएस (एमबीए) आणि एमसीए अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येईल. या दोन्हीही अभ्यासक्रमांना युजीसीबरोबरच एआयसीटीईचीही मान्यता मिळाली आहे. एआयसीटीईने आयडॉलला एमएमएस(एमबीए) च्या ७२० जागा, तर एमसीएच्या २ हजार जागांना मान्यता दिली आहे. पुढील वर्षी एमए मानसशास्त्र, एमएसडब्ल्यू, पत्रकारिता यांसारखे इतरही अनेक नवीन अभ्यासक्रम आयडॉलमधून सुरू केले जातील, असे आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी स्पष्ट केले. १७ नव्या अभ्यासक्रमांचा समावेश करत आयडॉल संस्था पदवी स्तरातील प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी व बीएस्सी संगणकशास्त्र, तसेच पदव्युत्तर स्तरातील प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर करेल, असेही त्यांनी सांगितले.

युजीसी म्हणजे काय ?

विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) ही भारतातील विद्यापीठीय शिक्षणावर नियंत्रण ठेवणारी देशातील सर्वोच्च संस्था आहे. यूजीसीची शिक्षण क्षेत्रातील भूमिका महत्त्वाची मानली जाते. याच यूजीसी अंतर्गत नव्या अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.