मुंबई विद्यापीठाकडून विधी अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्र विधी शाखेच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली. मात्र काॅन्स्टिट्यूशन लाॅ या विषयाच्या पहिल्याच पेपरला विद्यापीठाने घातलेल्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसला. विद्यापीठाने महाविद्यालयांना गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका पाठवल्याने परीक्षा तब्बल तासभर उशिराने सुरु करण्याची वेळ महाविद्यालयांवर आली.
परीक्षा तासभरासाठी पुढे ढकलावी लागली
परीक्षा सकाळी 11 वाजता सुरु होणार असल्याने, विद्यार्थी सकाळी 10:30 वाजता महाविद्यालयात पोहचले. मात्र परीक्षा सुरु झाल्यानंतर देण्यात आलेला पेपर हा गतवर्षीचा असल्याचे लक्षात आले. ही बाब महाविद्यालयांनी तातडीने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला कळवली. त्यानंतर विद्यापीठाने परीक्षा एक तासासाठी पुढे ढकलली. परीक्षा एक तास पुढे ढकलल्याने विद्यार्थी तणावाखाली होते. काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा का पुढे ढकलली याचे उत्तर मिळाले नसल्याने त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला.
( हेही वाचा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकणे महाविकास आघाडीच्या अंगलट )
Join Our WhatsApp Community