मुंबई विद्यापीठाने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर चक्क २५ परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. तसेच २९ जून रोजी जाहीर होणारी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियाची दुसरी यादी आता २८ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान शासकीय सुट्टीनुसार बकरी ईदची सुट्टी ही २८ जून २०२३ रोजी होती. परंतु ती सुट्टी आता २९ जून २०२३ रोजी देण्यात आल्याने मुंबई विद्यापीठाचे सर्व कार्यालये दोन दिवस बंद असतील याची विद्यार्थी व महाविद्यालये यांनी नोंद घ्यावी असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.
(हेही वाचा – अंबरनाथ स्थानकात प्रवाशांच्या ‘रेलरोको’मुळे लोकल सेवा विस्कळीत)
‘या’ परीक्षा ढकलल्या पुढे
जून २९ रोजी मुंबई विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेच्या एकूण २५ परीक्षा होत्या. त्यातील अभियांत्रिकी विद्याशाखेतील प्रथम वर्ष सत्र दोनच्या सर्व शाखेच्या (चॉईस बेस व सी स्कीम) या परीक्षा ३० जून २०२३ रोजी ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच बीएससी (हॉस्पिटॅलिटी स्टडीज) सीबीएसजीएस व चॉईस बेस सत्र ५, टीवाय बीएससी (फॉरेन्सिक सायन्स) सत्र ६, एमएससी व एमएससी (बाय रिसर्च) चॉईस बेस सत्र ४, बीकॉम (अकाउंटिंग अँड फायनान्स) चॉईस बेस सत्र ६, बीकॉम (इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट) सत्र ६, बीकॉम (फिनान्शियल मॅनेजमेंट) सत्र ६, टिवाय बीकॉम (आयडॉल) सत्र ६, बीकॉम (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट) सत्र ६, बीएमएस सत्र ५, एमए सीबीएसजीएस सत्र २ व ४, बीएड सत्र ४, व एमएड सत्र ४ अशा सकाळच्या सत्रातील १७ परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या असून यांची सुधारित तारीख ८ जुलै २०२३ आहे असे, मुंबई विद्यापीठाने सांगितले आहे.
तसेच दुपारच्या सत्रातील टीवाय बीएससी (फॉरेन्सिक सायन्स) सत्र ५, एमएमएस (आयडॉल) सत्र ३, टीवाय बीए (आयडॉल) सत्र ६, एमए (कम्युनिकेशन अँड जर्नालिझम) सत्र , एमए (पब्लिक रिलेशनस) सत्र ३, एमए (टेलिव्हिजन स्टडीज) सत्र ३, एमए (इलेक्ट्रॉनिक मीडिया) सत्र ३ आणि एमए (फिल्म स्टडीज ) सत्र ३ अशा आठ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत या परीक्षांची सुधारित तारीख ८ जुलै २०२३ रोजी ठेवण्यात आली आहे.
प्रवेशाची दुसरी यादी २८ जून रोजी जाहीर होणार
मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेची दुसरी यादी यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार दिनांक २९ जून २०२३ रोजी जाहीर होणार होती, परंतु बकरी ईदची सुट्टी २९ जून रोजी जाहीर झाल्याने, प्रवेशाची दुसरी यादी २८ जून २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता जाहीर होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community