मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, काय आहे कारण?

155

राज्यात सध्या मुसळधार पावसाने चांगलीच दाणादाण उडाली आहे. मुंबईसह राज्यातील इतर भागांना हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केला आहे. याची गंभीर दखल आता मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाने गुरुवारी होणा-या परीक्षा या पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

अतिवृष्टीच्या इशा-याने निर्णय

हवामान विभागाकडून मुंबईसह राज्यातील इतर भागांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या गुरुवारी होणा-या परीक्षा या रद्द करण्यात आल्या असून, या परीक्षांची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे मुंबई विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. अभियांत्रिकी शाखेसह इतर शाखांच्या परीक्षा गुरुवारी होणार होत्या. हवामान विभागाने दिलेल्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

(हेही वाचाः पावसामुळे राज्यातील काही भागात शाळांना दोन दिवस सुट्टी)

पुणे, ठाण्यातही शाळांना सुट्टी

मुंबई महानगर क्षेत्रातील ठाणे, नवी मुंबई, पनवेल आणि पालघर येथील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर पुणे शहर आणि परिसरात देखील चार पाच दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे व हवामान विभागाने गुरुवारी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने गुरुवारी पुणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळेला तसेच खाजगी शाळेला सुट्टी जाहीर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.