आविष्कार संशोधन स्पर्धेत Mumbai University ला सलग सहाव्यांदा विजेतेपद

56
आविष्कार संशोधन स्पर्धेत Mumbai University ला सलग सहाव्यांदा विजेतेपद
  • प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे १२ ते १५ जानेवारीदरम्यान आयोजित १७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय आविष्कार संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) उत्कृष्ट कामगिरी करत सलग सहाव्यांदा प्रथम क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने १३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ३ कांस्य पदकांसह अव्वल स्थान पटकावले.

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई विद्यापीठाच्या विजेत्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटले, “मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) विद्यार्थ्यांनी संशोधन, नाविन्यता आणि कल्पकतेच्या जोरावर या यशाने विद्यापीठाला उंची मिळवून दिली आहे. या संशोधन प्रकल्पांमुळे समाजजीवन सुसह्य व आनंददायी होईल.”

(हेही वाचा – Border-Gavaskar Review : क्रिकेटपटूंच्या मनमानीवर बीसीसीआय लावणार चाप, ऑस्ट्रेलियातील पराभवानंतर पहिली कारवाई)

राज्यभरातील २४ विद्यापीठांनी विविध प्रवर्गांमधून ४८ संशोधन प्रकल्प सादर केले होते. मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) सादर केलेल्या ४८ प्रकल्पांपैकी २३ प्रकल्पांना पारितोषिके मिळाली. सुवर्ण पदक विजेत्यांमध्ये बंडाबे, झनेटा रेमंड, राधिका भार्गव, श्रेयांस कांबळे, चैताली बने, कृष्णकांत लसुने, फरहीन शेख यांचा समावेश होता. रौप्य पदक विजेत्यांमध्ये अथर्व लखाने, चैत्रा देशपांडे यांचे नाव अग्रस्थानी होते, तर कांस्य पदके समृद्धी मोटे, तेजश्री जायभाये यांना प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाला कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या यशामुळे मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) शैक्षणिक क्षेत्रातील कर्तृत्वाला मान्यता मिळाली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.