राज्य सरकारने अनलॉक प्रक्रियेत राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवले, तर मुंबई आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित महापालिकांवर सोडले होते. त्याप्रमाणे मुंबई महापालिकेने मुंबईत नियम शिथील केले असून दुकाने १० वाजेपर्यंत सुरू राहणार असून हाॅटेल ४ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत.
राज्य सरकारने ब्रेक द चेन नियमावली जाहीर केल्यानंतर मुंबई महापालिकेने शहरासाठी नियमावली जाहीर केली आहे. मुंबई अजूनही लेव्हल-३ मध्ये आहे. त्यामुळे विकेंडच्या नियमात बदल केले आहे. दुकाने रात्री १० वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहे. तसेच हॉटेल संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुले राहतील. हॉटेल-रेस्टॉरंट सर्व दिवस संध्याकाळी ४ पर्यंत खुले राहण्यास मुभा दिली आहे. तर स्विमिंग पूल मात्र खेळासाठी बंद राहणार आहेत. मुंबईत चित्रिकरणाला आधीच्या नियमाप्रमाणे परवानगी राहणार आहे. नवीन नियम ३ ॲागस्टपासून लागू होतील.
सर्वसामान्यांसाठी लोकल नाहीच!
राज्यात कोरोनाची लाट आता आटोक्यात आली आहे. मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा सुरू करावी, अशी आग्रहाची मागणी होत आहे. पण नवी नियमावली जाहीर झाली असून लोकल सुरू करण्याबद्दल कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. राज्य सरकारकडून ११ जिल्हे वगळता अनलॅाकचे नियम शिथिल करण्यात आले आहे. या संदर्भात नवी नियमावली जाहीर केली आहे. पण मुंबईची लोकल सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. लोकल सुरू करण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कोर्टात टोलवण्यात आला आहे. त्यामुळे लोकल सुरू करण्याबद्दल वेगळी घोषणा होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community