गोवंडीत रुळाला तडे, हार्बर रेल्वे काही काळ बंद; सलग दुस-या दिवशी प्रवाशांचा खोळंबा

मुंबईतल्या हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक बुधवारी काही काळ बंद झाली आणि त्यामुळे प्रवाशांना सलग दुस-या दिवशी मनस्ताप सहन करावा लागला. हार्बर रेल्वे लाईनवरील गोवंडीत रेल्वे रुळाला तडा गेल्याने, काही काळ वाहतूक बंद होती. सकाळी 8:30 वाजता या रुळाची दुरुस्ती करुन वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली. परंतु लोकलची वाहतूक अजूनही उशीराने सुरु आहे. कार्यालयीन वेळेतच रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याने, सध्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

( हेही वाचा: ‘पक्षप्रमुख’ उल्लेख टाळत, एकनाथ शिंदेंनी अशा दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा )

सलग दुस-या दिवशी खोळंबा 

नवी मुंबई, पनवेलवरुन मोठ्या प्रमाणात नागरिक हार्बर मार्गावरील लोकलने मुंबईला येत असतात. परंतु गोवंडी स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने, वाहतूक ठप्प झाली. परिणामी स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दुरुस्ती झाली असून वाहतूक अद्यापही पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नाही. त्यामुळे स्थानकांवर गर्दीचे लोट कायम आहेत. सीबीडी आणि वाशिमधील लोक मोठ्या प्रमाणात मुंबईला जात असतात. परंतु लोकलचा खोळंबा झाल्याने, हे लोक स्थानकातून बाहेर पडत सायन-पनवेल महामार्गावरुन आता बस किंवा खासगी वाहन करत आपले कार्यालयीन ठिकाण गाठताना दिसत आहेत.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here