मुंबईवर अतिरेकी हल्ला होणार, अशा धमकीचे फोन, मेल इतके येत असतात की आता ही सामान्य बाब झाली आहे. मुंबईवर पुन्हा एकदा अतिरेकी हल्ला करण्याची धमकी मिळाली आहे. परंतु धमकी देणा-याने यावेळी ट्वीटर हॅंण्डलचा वापर केला आहे. ज्यात मुंबईला 26/11 सारख्या हल्ल्यासारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली.
मुंबई पोलिसांच्या ट्वीटर टीमला शुक्रवारी असे एक ट्वीट दिसले, आणि रात्रीच सर्व वरिष्ठ पोलिसांनी ही माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, 3 फेब्रुवारीला @indianslumdog नावाच्या ट्वीटर हॅंण्डलचा वापर करत एका व्यक्तीने ट्वीट केले. ज्यात चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याच्या The Attacks of 26/11 चित्रपटाच्या पोस्टरचा वापर करण्यात आला. यात लिहिले होते की, चित्रपटाचा दुसरा भाग कधी प्रदर्शित होईल?
( हेही वाचा: अग्निवीरांसाठी मोठी बातमी: भारतीय सैन्यदलाकडून भरती प्रक्रियेत बदल )
पोलिसांकडून तपास सुरु
सुरुवातीला हे ट्वीट कोणलाही आक्षेपार्ह किंवा संशयास्पद जाणवले नाही. पण या ट्वीटला कोट करुन @ghantekaking नावाच्या ट्वीटर हॅण्डलवरुन जे ट्वीट करण्यात आले, तेव्हा मुंबई पोलीस सतर्क झाले. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने तपास सुरु करुन शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
Join Our WhatsApp Community