पिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर क्रमांक १ च्या बी फेज करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये शनिवार , १४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ०१.०० वाजता अचानक बिघाड झाला. त्यामुळे पिसे उदंचन केंद्र येथील एकूण कार्यरत २० पंपांपैकी ६ उदंचन पंप बंद झाले आहेत. सदर दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर हाती घेण्यात आले आहे. हे दुरुस्ती काम दिनांक १४ डिसेंबर २०२४ व १५ डिसेंबर २०२४ रोजी सुरु राहणार आहे. (Mumbai Water Cut)
(हेही वाचा- Crime News : नवीमुंबईत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन, १६ आफ्रिकन नागरिकांना १२ कोटींच्या ड्रग्ससह अटक)
या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे शनिवार १४ डिसेंबर २०२४ ते रविवार १५ डिसेंबर २०२४ या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरांसह बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात येणार आहे. (Mumbai Water Cut)
सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की , त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून उपरोक्त नमूद कालावधीत पाणी काटकसरीने व जपून वापरावे असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. (Mumbai Water Cut)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community